Trending: गर्लफ्रेंडच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी प्रियकरानं केलं मृतदेहाशी लग्न; म्हणाला, आता कधीच लग्न करणार नाही
एक अशी घटना घडली आहे, जी ऐकून, वाचून आपलेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मृत्यूनंतर तिला शेवटचा निरोप देताना तिच्याशी लग्न केले.
Trending Emotional News: प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं कवीनं म्हणून ठेवलंय. प्रेमाला कुठलंही बंधन लागू पडत नाही. प्रेमाला कोणत्याही सीमेत बांधले जाऊ शकत नाही असं म्हणतात. जर तुमचं प्रेम खरं असेल तर ते मृत्यूनंतरही अमर राहतं असंही म्हटलं जातं. आपण अनेक लव्हस्टोऱ्या ऐकतो. प्रेमाचे किस्से, प्रेमातली भांडणंही ऐकतो. शिवाय काही घटना अशाही ऐकतो जिथं प्रेमामुळं एखाद्याची हत्या करायला लोकं मागेपुढे बघत नाहीत. मात्र आसाममध्ये एक अशी घटना घडली आहे, जी ऐकून, वाचून आपलेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. आसाममध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मृत्यूनंतर तिला शेवटचा निरोप देताना तिच्याशी लग्न केले.
आसाममधील या इमोशनल घटनेची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा सुरु आहे. या तरुणाने आपल्या प्रेयसीशी तिच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच सर्व नियम-कायदे बाजूला ठेऊन लग्न केले. सर्वांचा विरोध झुगारत यावेळी या तरुणाने प्रेयसीला कुंकू लावत लग्न तर केलेच, पण आयुष्यभर लग्न न करण्याची शपथही घेतली.
आसाममधील बिटुपन आणि प्रार्थनाची अनोखी लव्हस्टोरी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आसाममधील मोरीगावचा रहिवासी 27 वर्षीय बिटुपन तामुली आणि चपरमुखमधील कोसुआ गावातील 24 वर्षीय प्रार्थना बोरा हे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते आणि दोघे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. काही दिवसांपूर्वी प्रार्थनाला आजारी असल्यासारखं वाटू लागले आणि त्यांना गुवाहाटी येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. जिथं शुक्रवारी, 18 नोव्हेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रार्थनाच्या मृत्यूची बातमी कळताच बिटुपन पूर्णपणे खचला. त्याने तात्काळ तिचे घर गाठले आणि आपल्या प्रेयसीची नवरी बनण्याची इच्छा पूर्ण केली. त्यानं तिच्या मृतदेहाशी लग्न केले. यावेळी बिटुपन ओक्साबोक्सी रडत होता. हे दृश्य पाहणारांचे देखील डोळे डबडबून गेले होते.
ही बातमी सोशल मीडियावर वाचून, ऐकून देखील अनेकांच्या इमोशनल प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या प्रेमासाठी जगण्याची आणि मरण्याची शपथ घेणाऱ्या जोडप्याचा इतका वेदनादायक अंत पाहून कोणालाही रडू येईलच म्हणा. एखाद्याच्या मृत्यूनंतरही खरं प्रेम अमर असतं हे या तरुणानं प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं आहे. आता बिटुपननं आयुष्यभर लग्न न करण्याची शपथ घेतली आहे.
या घटनेनं मोरीगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही बातमी देखील वाचा