World News: इटलीत का जन्माला येत नाहीत मुलं? गेल्या तीन महिन्यांत एकाही बाळाचा जन्म नाही; धक्कादायक आहे कारण
World News: गेल्या तीन महिन्यांपासून इटलीत एकही बाळ जन्माला आलं नाही. हा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की, तेथील पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी याकडे राष्ट्रीय आणीबाणी म्हणून पाहतात.
इटली: अनेक पर्यटकांना भेट द्यावा वाटणारा देश म्हणजे इटली (Italy). इटलीची खाद्यसंस्कृती (Italian Food), तेथील राहणीमान (Lifestyle) आणि सुंदर ठिकाणांमुळे (Beautigul Tourist Places) मोठ्या संख्येनं पर्यटक इटलीला भेट देत असतात. पण, याच देशात आता एक वेगळीच समस्या निर्माण झाली आहे आणि ती म्हणजे - तिथे मुलांचा जन्म न होणं. रिपोर्ट्सनुसार, इटलीमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून एकाही मुलाचा जन्म झालेला नाही. ही समस्या इतकी मोठी आहे की इटलीचे पंतप्रधान (Italy PM) देखील या प्रश्नाकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहत आहेत.
इटलीमध्ये घटला जन्मदर
इंग्रजी न्यूज वेबसाईट मीडियमने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीने नुकताच एक नवा विश्वविक्रम केला आहे. मात्र, या विश्वविक्रमामुळे आनंद वाटण्यासारखं काही नाही, तर ही एक जागतिक समस्या आहे. गेल्या तीन महिन्यांत इटलीमध्ये एकाही बाळाचा जन्म झालेला नाही. इटलीत जन्म दर घटला आहे.
नॅशनल स्टॅटि्क्स ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत रॉयटर्सनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इटलीमध्ये जानेवारी 2023 ते जून 2023 पर्यंतच्या काळात जितक्या बाळांचा जन्म झाला तो आकडा जानेवारी 2022 ते जून 2022 च्या तुलनेत 3500 ने कमी आहे.
काय आहे यामागील कारण?
अहवालात समोर आलेल्या गोष्टीनुसार, याचं मुख्य कारण म्हणजे 15 ते 49 वयोगटातील महिलांची कमतरता. म्हणजेच, इटलीमध्ये प्रजननक्षम वयाच्या महिलांची कमतरता आहे, त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. 2021 च्या तुलनेत 2023 मध्ये अशा महिलांची संख्या फार कमी झाली आहे.
पंतप्रधान म्हणतात ही 'राष्ट्रीय आपत्ती'
इटलीवर ओढावलेली ही परिस्थिती इतक्या बिकट वळणावर पोहोचली आहे की, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) देखील या समस्येकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहत आहेत. मागील वर्षी आपल्या निवडणूक प्रचारामध्येही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. इटलीमध्ये परिस्थिती इतकी भीषण आहे, की मागील वर्षभरात इथे दर 7 मुलांच्या जन्मामागे 12 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला.
सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, इथे एका दिवशी सात मुलांचा जन्म होतो, तर हेच दुसरीकडे 12 नागरिकांचा मृत्यूही होतो. हेच चक्र इटलीत सुरु राहिलं तर इटलीची लोकसंख्या अतिशय झपाट्याने कमी होईल, अशीच भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहे. आता इटली या समस्येचा सामना कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा: