एक्स्प्लोर

Independence Day 2023: दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमधील सुरक्षा वाढली; काय आहे त्यामागचं कारण?

Delhi News: दक्षिण दिल्लीतील सरोजिनी नगर मार्केटमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. प्रत्येक एंट्री आणि एक्झिट गेटवर नजर ठेवली जात असून संशयितांचीही चौकशी केली जात आहे.

Independence Day 2023: स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर (Independence Day) दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आहेत. दिल्लीतील प्रमुख ठिकाणं आणि गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर आहे. कोणत्याही प्रकारचा दहशतवादी कट रचणाऱ्या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पोलीस काम करत आहेत, अनेक ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपास अधिक कडक करण्यात आला आहे. अशातच, फक्त दिल्लीच नाही, तर देशभरात प्रसिद्ध असलेल्या दिल्लीच्या सरोजिनी नगर मार्केटमध्येही (Sarojini Market) पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. प्रत्येक एंट्री आणि एक्झिट गेटवर नजर ठेवली जात असून संशयितांचीही चौकशी केली जात आहे.

काही वर्षांपूर्वी सरोजिनी नगर मार्केटमध्ये झाला होता स्फोट

सरोजिनी नगर मार्केट हे होलसेल कपडे खरेदीचं मोठं केंद्र आहे. केवळ दिल्लीच नाही, तर दिल्लीबाहेरूनही लोक खास कपडे खरेदीसाठी सरोजिनी नगर मार्केटला येतात आणि त्यामुळेच येथे खरेदीदारांची नेहमीच गर्दी असते. याच कारणामुळे काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी सरोजिनी नगर मार्केटला आपलं लक्ष्य बनवलं होतं, ज्याच्या आठवणी आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत. गेल्या वर्षीही या मार्केटला दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली होती. दिल्लीतील गजबजलेलं आणि संवेदनशील ठिकाण असल्याने दिल्ली पोलिसांनी सरोजिनी मार्केटमधील सुरक्षा वाढवली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क असून 15 ऑगस्टपर्यंत सरोजिनी नगर मार्केटची सुरक्षा व्यवस्था  कडक करण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनासह सुरक्षारक्षक देखील तैनात

एबीपी लाइव्हच्या टीमशी संवाद साधताना सरोजिनी नगर मिनी मार्केट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक रंधावा यांनी सांगितलं की, दिल्ली पोलिसांनी 15 ऑगस्ट आणि जी-20 च्या पार्श्वभूमीवर सरोजिनी मार्केटची सुरक्षा वाढवली आहे. दिल्ली पोलिसांच्या अलवाल BSF चे जवानही मार्केटमध्ये तैनात असून सर्वत्र नजर ठेवली जात आहे. त्याचबरोबर दुकानदारांच्या वतीनेही 10 सुरक्षा रक्षक बाजारात तैनात करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून दुकानदारांना सतर्क राहण्याचं आवाहन

दिल्ली पोलिसांनी सरोजिनी नगर मार्केटमधील दुकानदारांसोबत एक बैठकही घेतली होती, ज्यामध्ये दुकानदारांना सांगण्यात आलं होतं की, दुकानात कोणत्याही ग्राहकाचं सामान ठेवू नये आणि कोणत्याही अनोळखी वस्तूंना हात लावू नये. पोलिसांनी सर्व दुकानदारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. दुकानदार हे पोलीस प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र, पोलिसांचं पथक वारंवार मार्केटमध्ये येत असल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होत आहे, मात्र अशा परिस्थितीत सुरक्षाही आवश्यक आहे. मात्र, पोलिसांकडून करण्यात येणारं अनाऊन्समेंट सध्या बंद झालं असून, ते सुरू करण्यात यावं, असं मार्केटचे अध्यक्ष म्हणाले.

हेही वाचा:

Gyanvapi Masjid ASI Survey : ज्ञानवापीच्या तळघरात आणखी काय सापडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Wardha  Speech : आआरक्षण कोणी माई का लाल संपवू का शकत नाहीABP Majha Headlines 2 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सKisan Adhikari Candiddate captivity : किसान अधिकार अभियानाचे पदाधिकारी पोलिसांच्या नजरकैदेतNCP Muslim Candidate : 10 टक्के जागांवर राष्ट्र्वादी मुस्लिम उमेदवार देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?
तिरुपती बालाजी प्रसादाचा लाडू कसा तयार होतो? 300 वर्षांपासून चालत आली पाककृती
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
श्रीलंकेच्या इतिहासात उद्या सर्वात मोठा दिवस, पण सर्वाधिक चर्चा गौतम अदानींची रंगली; दिलेला शब्द खरा होणार?
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
भारताचे संरक्षणमंत्री राफेल घ्यायला जातात अन् लिंबू मिरच्या लावतात; कराळे मास्तरांची तुफान फटकेबाजी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप 
Ajit Pawar NCP: भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
भाजप नेत्यांची जहाल भाषा पण मुंबईत अजितदादांचं मुस्लीम कार्ड, मुंबईतील 4 जागांवर कोणाला संधी?
Nashik News : नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
नाशिकच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल, शहरात एकच खळबळ
Supreme Court Youtube Hack : सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनेल हॅक; 'हे' व्हिडिओ होतायत शेअर,नेमकं कारण काय?
West Bengal Doctor : पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येण
पश्चिम बंगालमधील ज्युनिअर डॉक्टरांचा संप अखेर मागे; आज सीबीआय कार्यालयावर मोर्चा, उद्यापासून कामावर येणार
Embed widget