ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण
ट्रक आणि दुचाकीवरील अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हैदराबाद - अपघाताच्या घटनांना नेहमी जड वाहनधारकांना जबाबदार धरले जाते. त्यासंदर्भाने केंद्र सरकारने ट्रकचालक किंवा जड वाहनांसंबंधित कडक कायदे करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ट्रकचालक संघटनांनी त्यास विरोध केला होता. आता, हैदराबादमधील भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहिल्यांतर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची आठवणही काहींना झाली. कारण, ट्रकचालकांचा बेजबादारपणा या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी तेलंगाणातील हैदराबाद पोलिसांना ट्रकचालकास अटक केली आहे.पृथ्वीराज असं या ट्रक चालकाचं नाव असून त्यामुळे दुचाकी चालकाचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने, नशिब बलवत्तर म्हणूनच दुचाकीचालक बचावल्याची भावनाही अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
ट्रक आणि दुचाकीवरील अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, दुचाकीस्वाराला धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने तसेच फरफटत नेले असून दुचाकीचालकाने प्रसंगावधानता राखत ट्रकच्या बाजूला लटकून आपला जीव वाचवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. दुचाकीस्वार ट्रकवर लटकलेला असताना आणि दुचाकी आपल्या ट्रकच्या चाकाखाली असतानाही ट्रकचालक वेगाने गाडी चालवत असल्याने नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. 14 एप्रिल रोजीची ही घटना असल्याचे समजते, संबंधित ट्रकचालकाने आणखी एका कारला धडक दिल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी, दुचाकी चालकाने संबंधित घटनेची तक्रार पोलिसात दाखल केल्यानंतर ट्रकचालकाच अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडे 15 एप्रिल रोजी हैदराबादमधील अब्दुल मजीद (60) यांनी तक्रार दाखल केली. 11 एप्रिल रोजी आपण चंपापेट, लक्ष्मी गार्डन परिसरातून रात्री 11 वाजता दुचाकीवरुन जात होतो. त्यावेळी, पाठीमागून वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असलेल्या चालकाच्या ट्रकने मजीदच्या दुचाकीला धडक दिली. मात्र, धडक दिल्यानंतरही ट्रकचालक जागेवर न थांबता बाईकला फरफटत नेत पुढे गेला. सुदैवाने मजीदने ट्रकच्या दरवाज्याला लटकून स्वत:चा जीव वाचवला.
ट्रकच्या पाठीमागून येत असलेल्या दुचाकीस्वारांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुदैवाने मजीदचा जीव वाचला पण त्यांच्या दुचाकीचं मोठं नुकसान या अपघातात झालं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपी चालकात अटक करण्यात आली आहे. तसेच, पुढील अधिक तपास सुरू आहे. मात्र, या व्हिडिओनंतर ट्रक चालकांनी मध्यतंरी पुकारलेल्या संपाची आठवण सांगत, काही सरकारने बनवलेले नियम किंवा कायदे गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे. कारण, ज्या निष्काळजीपणे ट्रकचालकाने व्हिडिओत वाहन चालवल्याचे दिसून येते, त्यावरुन ही गंभीर बाब असल्याचंही नेटीझन्सने म्हटलं आहे.