Human Barbie : आधी लिंग बदललं, नंतर बनली 'बार्बी डॉल'... परीहून सुंदर दिसण्यासाठी महिलेनं स्वतःवर खर्च केले 10 कोटी, तरी भरलं नाही मन
Human Barbie : आधी लिंग बदलून बनली महिला, मग बनली रिअल लाईफ 'बार्बी डॉल' बनण्यासाठी खर्च केले 10 कोटी, आता दिसते अशी...
Human Barbie Jessica Alves : शौक बडी चीज है... सुंदर दिसण्यासाठी सध्या जगात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही लोक सुंदर दिसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात आणि त्यासाठी महागडे प्रोडक्टसही वापरतात. काही जण शस्त्रक्रिया करतात. सौंदर्यासाठी महिलांप्रमाणे पुरुषही मेहनत घेताना दिसतात. याबाबतही अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. अशीच एक बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एका पुरुषाने महिला होण्यासाठी आधी लिंग बदल शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्या महिलेने सुंदर दिसण्यासाठी स्वत: वर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. इतकंच नाही तर यासाठी तिने 100 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.
आधी लिंग बदललं, नंतर बनली 'बार्बी डॉल'
खऱ्या खुऱ्या आयुष्यात बार्बी डॉलसारखं दिसण्यासाठी या महिलेने आतापर्यंत 10 कोटी रुपये खर्च केले आहे, पण तरीही ती खूश नाही. ब्रिटनमधील एका महिलेनं बाहुलीसारखं सुंदर दिसण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया करून स्वतःवर 10 लाख पौंड म्हणजेच 10 कोटी रुपये खर्च केले. या महिलेच्या जवळजवळ 100 टक्के शरीरावर शस्त्रक्रिया केल्या आहेत. तिच्या शरीराचा असा एकही भाग शिल्लक नाही, ज्यावर शस्त्रक्रिया झाली नसेल. यामुळेच ती आता बार्बी डॉलसारखी दिसतेय. विशेष म्हणजे, ही महिला आधी पुरुष होती, त्यानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया करुन ती महिला झाली. त्यानंतर तिने सुंदर दिसण्यासाठी शेकडो शस्त्रक्रिया केल्या.
View this post on Instagram
100 हून अधिक शस्त्रक्रिया
बिट्रनमधील या हुबेहुब बॉर्बी डॉलप्रमाणे दिसणाऱ्या महिलेचं नाव जेसिका अल्वेस (Jessica Alves) आहे. जेसिका आधी मुलगा होती. तिने पुरुष लिंग बदलून स्त्री केलं. जेसिकाचे नाव आधी रॉड्रिगो होतं, पण तिने लिंग बदलल्यावर स्वत:चं नाव बदलून जेसिका ठेवलं. 100 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या.
'बार्बी डॉल'प्रमाणे दिसण्याची इच्छा
जेसिका अल्वेस ही ब्राझिलियन-ब्रिटिश टीव्ही सेलिब्रिटी आहे. तिचा जन्म ब्राझीलमध्ये झाला. वयाच्या 19 व्या वर्षी ती शिक्षणासाठी लंडनला गेली. जेसिका आता 39 वर्षांची आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिने पहिली शस्त्रक्रिया केली. यावेळी लिंग बदल शस्त्रक्रिया करून ती महिला बनली. त्यानंतर तिला रिअल लाईफ बार्बी बनण्याची इच्छा होती, यासाठी तिने वारंवार शस्त्रक्रिया केल्या. जेसिकाने केलेल्या कॉस्मेटिक सर्जरीची एक लांबलचक यादी आहे, ज्यामध्ये नाक जॉब, कॉफी शेपिंग, हिप शेपिंग, ब्रेस्ट इम्प्लांट आणि 100 हून अधिक शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
'ह्युमन बार्बी'चे लाखो चाहते
39 वर्षीय जेसिका 'ह्युमन बार्बी' म्हणून ओळखली जाते. शेकडो शस्त्रक्रिया आणि कोट्यवधी खर्च करुनही ती खूश नाही. आणखी सिंदर दिसण्यासाठी तिचे प्रयत्न सुरु आहेत. नुकतीच जेसिकाने ब्राझीलमध्ये तिसरी ब्रेस्ट सर्जरी केली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जेसिकानं सांगितलं की, संपूर्ण शरीरावर प्लास्टिक सर्जरी केल्यामुळेच जेसिका 'डॉल'सारखी दिसते. तिच्या कर्व्ही फिगरचे लाखो चाहते आहेत. ती मॉडेलिंग आणि फोटोशूट करून लाखो रुपये कमवते. जेसिकाचे इंस्टाग्रामवर 7.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.