Groom Special Gift To Bride : वधूचे स्वप्न वराने केले पूर्ण, दिली 'ही' आश्चर्यकारक भेट! एकदा पाहाच
Groom Special Gift To Bride : लग्नाच्या दिवशी दिलेल्या भेटवस्तू खूप महत्त्वाच्या आणि मौल्यवान असतात. या भेटवस्तू वधू-वरांच्या आयुष्यभर लक्षात राहतात.
Groom Special Gift To Bride : लग्नाचा दिवस वधू-वरांसाठी खूप खास असतो. या दिवशी वधू आणि वर एकमेकांना भेटवस्तू देखील देतात. लग्नाच्या दिवशी दिलेल्या भेटवस्तू खूप महत्त्वाच्या आणि मौल्यवान असतात. या भेटवस्तू वधू-वरांच्या आयुष्यभर लक्षात राहतात. अशीच एक भेट वराने आपल्या वधूला दिली होती. हे केवळ भेटवस्तू नव्हते तर ते वधूचे स्वप्न देखील होते.
वधूचे स्वप्न वराने केले पूर्ण!
इंस्टाग्रामवरील पोस्टनुसार, वधूचे एक स्वप्न होते, जे तिने तिच्या भावी नवऱ्याला सांगितले होते. ते पूर्ण करण्यासाठी वराने सर्वतोपरी प्रयत्न केले. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वधू लग्नाच्या निमित्ताने तिचे फोटोशूट करत होती. त्यानंतर वराला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी हातात मोठा बोर्ड घेऊन स्टेजवर पोहोचला.
वधूला भेट म्हणून काय मिळाले?
वधूने पाटी वाचताच तिला आश्चर्य वाटले, कारण या बोर्डवर असे काहीतरी होते जे तिचे स्वप्न होते. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, '28 मे 2022 हा एक अतिशय खास क्षण आहे, जिथे मी माझा 25 वा वाढदिवस आणि साखरपुडा समारंभ साजरा केला.'
View this post on Instagram
कॅप्शनने पुढे लिहिले की, '@nikhilskhabiya तुम्ही मला माझ्या स्वप्नातील डेस्टिनेशन ट्रिप भेट देऊन माझ्यासाठी खूप खास बनवले आहे. माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी त्याला सांगितले होते की, आईसलँड, फिनलंड आणि नॉर्वेला फिरायला जाणे ही माझी स्वप्ने आहेत.
सर्वजण आश्चर्यचकित
वराची ही भेट पाहून समारंभात उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. सगळ्यांना वराची भेट खूप आवडली. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सिमरन बलर्जैन नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video : हाय गरमी... स्कूटीच्या सीटवर तयार केला डोसा; व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : एक फूल दो माली... सिंहीणीसाठी भिडले दोन सिंह, कोणी मारली बाजी? पाहा व्हिडीओ
- Viral Video : 5 महिन्यांच्या चिमुकल्याचं आईसोबत वर्कआऊट, पाहा व्हिडीओ