भारत ते व्हिएतनाम प्रवास फक्त 26 रुपयात, 'या' एअरलाइन्सची भन्नाट ऑफर
VietJetAir Offer: जर तुमची व्हिएतनाम फिरण्याची इच्छा आहे, तर तुम्हाला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. कारण यावेळी तुम्ही भारतातून व्हिएतनामला फक्त 26 रुपयांमध्ये जाऊ शकता.
VietJetAir Offer: जर तुमची व्हिएतनाम फिरण्याची इच्छा आहे, तर तुम्हाला यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही. कारण यावेळी तुम्ही भारतातून व्हिएतनामला फक्त 26 रुपयांमध्ये जाऊ शकता. होय, तुम्हाला वाचून जरा विचित्र वाटत असेल, पण हे खरं आहे. तुम्ही भारत ते व्हिएतनामचा प्रवास अवघ्या 26 रुपयांमध्ये करू शकता. एक विमान कंपनी ही भन्नाट ऑफर देत आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी संधी पुन्हा मिळणार नाही.
ही जबरदस्त ऑफर व्हिएतनामच्या व्हिएतजेट (VietJetAir) एअरलाइन्सने दिली आहे. कंपनी फक्त 9,000 व्हिएतनामी डोंग (VND) च्या विमान भाड्यावर तिकीट ऑफर घेऊन आली आहे. व्हिएतनामी चलनाचे मूल्य भारतीय चलनाच्या तुलनेत खूपच कमी आहे. 9,000 व्हिएतनामी डोंग भारतीय चलनात सुमारे 25 ते 30 रुपये इतके आहे. एअरलाइन्सची ही ऑफर सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावरील उड्डाणांसाठी आहे.
ही आहे प्रवासाची टाइमलाइन
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 13 जुलैपर्यंत तिकीट बुक करावे लागेल. यानंतर तुम्ही 26 मार्च 2023 नंतर प्रवासासाठी वेळ निवडू शकता. भारतीय प्रवाशांसाठी ही ऑफर सप्टेंबरपासून सुरू होईल. ग्राहक नवी दिल्ली आणि मुंबई ते हनोई, हो ची मिन्ह सिटी आणि व्हिएतनाममधील फु क्वोक तिकीट बुक करू शकतात.
भारतातून विमानसेवा सुरू
व्हिएतजेटने अलीकडेच भारतातून 5 नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर हवाई सेवा सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद आणि बंगळुरू हे शहर अडा नांग शहराशी जोडले गेले आहेत. या आधी कंपनीने 4 हवाई मार्गांवर आपली विमानसेवा सुरू केली होती. यामध्ये दिल्ली आणि मुंबई ते हनोई आणि हो ची मिन्ह सिटीचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Viral Video : रिक्षा आहे की टेम्पो... तब्बल 27 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video: 'हे ऐकल्यावर कानातून रक्त आलं'; ‘मेरे महबूब कयामत होगी’ गाणं गाणारा व्यक्ती ट्रोल