Viral : हाथी मेरे साथी! पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीसाठी देवदूत बनला हत्ती, पाहा कसा वाचवला जीव
Elephant Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हयरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हत्ती नदीमध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवताना दिसत आहे.
Trending Video : प्राण्याचं माणसांसोबत वेगळंच नातं असतं. अनेक वेळा प्राणी माणसांची मदत करताना पाहायला मिळतात. कुत्रा, मांजर, पोपट यासारखे प्राणी माणसांचे जणू मित्र समजले जातात. हत्तीचं ही माणसांवर विशेष प्रेम असल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यांच्या प्रेमाची भाषा वेगळीच असते. हेच सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एका हत्तीनं देवदूत बनत माणसाचा जीव वाचवला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक हत्ती माणसाचे पारण वाचवताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कुत्रा या प्राण्याला अनेकदा माणसांचा जीव वाचवताना पाहिलं जातं. पण तुम्ही कधीही हत्तीला एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवताना पाहिलं नसेल. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला याचा अनुभव येईल. या व्हायरल व्हिडीओमधून 'हाथी मेरे साथी' चित्रपटाची आठवण होतं.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडीओमध्ये नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये एक व्यक्ती बुडताना दिसत आहे. यावेळी शेजारी नदीच्या किनाऱ्यावरच एक हत्तीचा कळप उभा आहे. या कळपातील एका हत्तीची नजर बुडणाऱ्या व्यक्तीवर पडते. यानंतर हा हत्ती बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धाव घेतो आणि त्या व्यक्तीला सुखरुप पाण्याबाहेर काढून त्याचा जीव वाचवतो.
This young elephant spots a man he thinks is drowning in the river, and rushes across to save him, so tenderly. We are so lucky to share the world with such creatures. They are so unlucky to share it with us. pic.twitter.com/BIyQSqJ5HU
— Ben Goldsmith (@BenGoldsmith) September 15, 2019
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स कमेंट करत आहेत. माणसाला बुडताना पाहिल्यानंतर हत्तीने क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. @bengoldsmith नावाच्या युजरने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 7.3 दशलक्षहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओला नऊ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :