Door of Hell : 'हा' आहे नरकाचा दरवाजा, येथे गेलेला माणूस जिवंत परत येत नाही; कुठे आहे 'हे' ठिकाण
Intresting Fact : इथे आहे नरकाचा दरवाजा, येथे गेलेला माणूस जिवंत परत येत नाही.
Door of Hell : जगात अशी अनेक रहस्य आहेत, ज्याचं रहस्य उलगडणं अद्याप बाकी आहे. जगात वेगवेगळी ठिकाणी आहे, जी काही वेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणं निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत तर, काही खाद्यपदार्थांसाठी. याशिवाय इतरही काही ठिकाणं आहे, जी विचित्र कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही बर्मुडा ट्रँगलबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल, जिथे कोणतंही विमान किंवा जहाज गेलं तर ते जिवंत परत येत नाही. अद्याप याबाबत शास्त्रज्ञ शोध घेत असून याबाबतचं सत्य आणि रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, जगात एक ठिकाणं असंही आहे, ज्याला 'नरकाचं द्वार' म्हटलं जातं. येथे गेलेली कोणतीही व्यक्ती जिवंत परत येत नाही, असं म्हटलं जातं.
रहस्यमय आहे 'हे' ठिकाण
जगातील हे ठिकाण 'नरकाचं द्वार' म्हणतात. हे एक मंदिर आहे. हेरापोलिसमध्ये असणाऱ्या मंदिराची फार रहस्यमय कहाणी प्रचलित आहे. प्रचलित कथा आणि मान्यतांनुसार, येथे गेलेली व्यक्ती जिंवत परत येत नाही. यामुळे या ठिकाणाला नरकाचं द्वारं म्हटलं जातं. लोकांमध्ये अशी मान्यता आहे की, येथील नरकातील देवतांच्या वास्तव्यामुळे येथील हवा विषारी आहे. यामुळेच येथे येणाऱ्या लोकांचा मृत्यू होतो आणि ते जिवंत परतत नाहीत.
कुठे आहे नरकाचे द्वार?
हेरापोलिस मंदिराची ही गोष्ट खूप प्रचलित आहे. हेरापोलिस हे तुर्कीमधील एक ग्रीक शहर आहे. हे ठिकाण अनेक वर्ष रहस्यमयी राहिलं आहे. हे मंदिर नरकाचे द्वारं म्हणून ओळखलं जातं. तसेच याला प्लुटोचे मंदिर किंवा मृत्यूच्या देवतेचे मंदिर म्हणून ओळखलं जाऊ लागले. अनेक वर्षांपासून असे मानले जात होते की, मृत्यू लोकाच्या देवाच्या श्वासोच्छवासामुळे मंदिरात किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरात विषारी वातावरण आहे. यामुळे येथे जाणाऱ्यांचा मृत्यू होतो. येथे वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे या मंदिराला लोकांनी 'नरकाचे प्रवेशद्वार' असे नाव दिलं आहे.
शास्त्रज्ञांनी उघडला रहस्यावरून पडदा
दरम्यान, अनेक वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी येथे सतत होणाऱ्या मृत्यूचे कारण शोधून काढले. शास्त्रज्ञांनी सांगितले की, या मंदिराच्या खालून विषारी कार्बन डायऑक्साईड वायू सतत बाहेर पडतो. यामुळे माणूस किंवा प्राणी कार्बन डायऑक्साईड वायूच्या संपर्कात आल्यास त्याचा मृत्यू होतो. कार्बन डाय ऑक्साईड वायू फार विषारी आणि धोकादायक आहे. हा विषारी वायू केवळ 10 टक्के वायूमुळे 30 मिनिटांत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. तर या मंदिराच्या खालील गुहेत कार्बन डायऑक्साईडसारख्या विषारी वायूचे प्रमाण 91 टक्के आहे.