(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bermuda Triangle : आता करा बर्म्युडा ट्रँगलची सफर, ट्रॅव्हल एजन्सीची विचित्र ऑफर, जहाज हरवल्यास 100 टक्के पैसे परत
Bermuda Triangle Trip Offers : बर्म्युडा ट्रँगलमध्ये जहाजं आणि विमानं गायब होण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी याबाबत वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत.
Bermuda Triangle Trip Offers : रहस्यमय बर्म्युडा ट्रँगलची सफर (Bermuda Triangle Tour)... होय, एक ट्रॅव्हल एजन्सी चक्क रहस्यमयी बर्म्युडा ट्रँगलच्या ट्रिपची ऑफर देत आहे. लहानपणापासून आपण अनेक रहस्यमय आणि आश्चर्यकारक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यामधील एक म्हणजे बर्म्युडा ट्रँगल. बर्म्युडा ट्रँगल जेथे विमानं, जहाज आणि सर्वकाही अदृश्य होतं. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधक यामागचं कार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अद्याप या मागचं रहस्य कायम आहे. अशातच आता एका अमेरिकन ट्रॅव्हल एजन्सीने बर्म्युडा ट्रँगलची सफर घडवण्याचा दावा केला आहे. इतकं नाही तर जर यादरम्यान जहाज बुडालं तर एजन्सीकडून त्यांना पूर्ण रिफंड मिळणार असल्याचंही म्हटलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ब्रिटिश मीडियाने ही माहिती दिली आहे.
कुख्यात बर्म्युडा ट्रँगलमध्ये आतापर्यंत अनेक जहाज आणि विमानं अदृश्य झाली आहेत. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. यामागे हवामान आणि मानवी चुकांना जबाबदार धरण्यात येतं आहे. कॉन्सपिरेसी थियरिस्ट (Conspiracy theorists) जहाजं आणि विमानं गायब होण्यामागे अलौकिक कारणं आणि एलियन असल्याचंही म्हटलं आहे.
'बरमुडा ट्रँगल टूरवर गायब होण्याची काळजी करू नका'
अमेरिकन ट्रॅव्हल एजन्सी एन्शियंट मिस्ट्रीज क्रूझने (Ancient Mysteries Cruise) ही टूर ठरवली आहे. या ट्रॅव्हल एजन्सी तिच्या वेबसाइटवरील जाहिरातीमध्ये म्हटलं आहे की, 'या बर्म्युडा ट्रँगल टूरवर गायब होण्याची काळजी करू नका. या टूरमध्ये 100 टक्के परतावा मिळणार आहे. तुम्ही हरवल्यास ( हरवण्याची शक्यता फारच कमी आहे) शंभर टक्के परतावा मिळेल. पुढील वर्षी मार्चमध्ये प्रवासी अटलांटिक महासागर ओलांडून नॉर्वेजियन प्राइमा लाइनरने न्यूयॉर्क ते बर्म्युडा असा प्रवास करतील.
प्रवाशांना इतके पैसे मोजावे लागणार
या विचित्र ऑफरसाठी प्रवाशांना जहाजावरील एका केबिनसाठी सुमारे 1,450 पाऊंड म्हणजे सुमारे दिड लाख रुपये मोजावे लागतील.
इतर बातम्या