Guarantee And Warranty : गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये नेमका फरक काय? अनेकजण सहसा 'या' गोष्टींबद्दल गोंधळतात
Guarantee And Warranty : गॅरंटी आणि वॉरंटी असलेली उत्पादने काहीशी विश्वासार्ह आहेत. पण त्यांच्यातही अनेकदा काही दोष असतात.
![Guarantee And Warranty : गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये नेमका फरक काय? अनेकजण सहसा 'या' गोष्टींबद्दल गोंधळतात Difference Between Guarantee And Warranty know here marathi news Guarantee And Warranty : गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये नेमका फरक काय? अनेकजण सहसा 'या' गोष्टींबद्दल गोंधळतात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/22/47821b348f148cc094a5c49a7147e3fe1674384297448358_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वॉरंटी म्हणजे काय? (What is Warranty) :
वॉरंटी ही सहसा लेखी स्वरूपात दिलेली हमी असते आणि ती सदोष उत्पादन किंवा त्याचे भाग दुरुस्त करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी उत्पादनाच्या निर्मात्याला जबाबदार धरू शकते. याचाच अर्थ असा होतो की विक्रेता विशिष्ट कालावधीसाठी ग्राहकाला वॉरंटी देत आहे की जर दिलेल्या वेळेत वस्तूमध्ये काहीही कमतरता किंवा दोष असेल तर ग्राहकाला त्या वस्तूची दुरुस्ती मोफत मिळते. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे त्या वस्तूचे बिल असणे आवश्यक आहे.
वॉरंटी वस्तू खरेदी करताना, खात्रीपूर्वक बिल आणि तुमचे वॉरंटी कार्ड घ्या
उदाहरणार्थ, समजा तुम्ही वॉशिंग मशीन किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केली आहे, ज्यावर तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला त्या वॉरंटीचा फायदा मिळतो की वॉशिंग मशिन किंवा ज्या वस्तूवर वॉरंटी दिली गेली असेल, जर त्यात एक वर्षाच्या आत काही दोष असेल, तर कोणतेही पैसे न भरता तुम्ही ती दुरुस्त करून घेऊ शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे त्याचे कन्फर्म केलेले बिल किंवा दिलेले वॉरंटी कार्ड असणे आवश्यक आहे. म्हणूनच वॉरंटी वस्तू खरेदी करताना, खात्रीपूर्वक बिल आणि तुमचे वॉरंटी कार्ड घ्या आणि ते सुरक्षितपणे ठेवा.
गॅरंटी म्हणजे काय? (What is Guarantee) :
गॅरंटी म्हणजे उत्पादकाने ग्राहकाला दिलेले वचन आहे की उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्यास, किंवा काहीही कमतरता असल्यास ग्राहक उत्पादनाची दुरुस्ती, बदली करू शकतो. उत्पादन वॉरंटी कालावधीत समाविष्ट होईपर्यंत ग्राहकांना दुरुस्ती किंवा सेवांसाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)