Trending News : असा पकडला चोर; फूड डिलेव्हरी बॉय मारत होता कस्टमरच्या ऑर्डरवर ताव, अन्...
एका डिलेव्हरी बॉयचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Trending News : जेव्हा आपण ऑनलाइन पद्धतीनं जेवण किंवा एखादा पादार्थ ऑर्डर करतो, तेव्हा त्याची डिलेव्हारी ही लवकर व्हावी असे अपल्याला वाटते. हाऊस पार्टी असो किंवा एखादा कार्यक्रम लोक सध्या ऑनलाइन पद्धतीनंच जेवण ऑर्डर करतात. डिलेव्हरी बॉय फूड डिलेव्हरी करतो. हा डिलेव्हरी बॉयच तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ खात आहे, असा विचार तुम्ही कधी केला आहे का? एका डिलेव्हरी बॉयचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. यामध्ये तो डिलेव्हरी बॉय पदार्थाची डिलेव्हरी देताना चक्क त्या पदार्थावर ताव मारताना दिसत आहे.
रिपोर्टनुसार, ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या पोकिश नायफ स्टोररनं रात्री एका हॉटेलमधून जेवण ऑर्डर केलं. ऑर्डर दिल्यानंतर काही वेळेनंतर एक डिलेव्हरी बॉय हा तीन चिकन रॅप, एक ग्रिल्ड चिकन बर्गर, चार चिप्स आणि चार ड्रिंक अशी ऑर्डर घेऊन पोकिशच्या घरी पोहचला. पोकिशला त्यानं ऑर्डर केलेले पदार्थ देण्याआधी त्या डिलेव्हरी बॉयनं काही चिप्स खायला सुरूवात केली. डिलेव्हरी बॉयचे हे कृत्य सीसी टिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं. पोकिश नायफ हे सर्व त्याच्या मोबाईलमधून पाहात होता.
Shocking moment customer caught fast food delivery driver "eating his chips" pic.twitter.com/Uotrxqdg4o
— The Sun (@TheSun) March 21, 2022
पोकिशनं सांगितलं की त्यानं त्याच्या पत्नीला फोन करून ही माहिती दिली. पोकिशचं बोलणं ऐकून त्याची पत्नी देखील हैराण झाली. त्यानंतर पोकिशनं ज्या हॉटेलमधून जेवण मागवण्यात आलं त्या हॉटेलला फोन करून तक्रार केली. तक्रार केल्यानंतर डिलेव्हरी बॉयनं त्यावर स्पष्टीकरण दिलं की, तो त्याच्या बॅगेमधून बिस्किट काढत होता.
संबंधित बातम्या
- Trending News : मुलीच्या घरी डेटसाठी गेला अन् अचानक तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली; कारण माहितीये?
- Viral Signature : 'हे तर साळिंदर'; मेडिकल कॉलेजमधील अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने मीम्स आणि जोक्सचा पाऊस
- Viral Video : चहाप्रेमींनो 'हा' 'फ्रुट टी' प्यायलात का? सुरतमध्ये मिळतोय सफरचंद, केळी आणि चिकूचा चहा; व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha