Viral Video: 'जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा', टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक; पाहा व्हिडीओ
Delhi Metro Viral Video : आजकाल रिल्स बनवण्याची क्रेझ जास्त वाढताना दिसत आहे. यासाठी लोक काहीही करताना दिसत आहेत. काही ट्रेनच्या आत डान्स करताना दिसत आहेत, तर काही स्टंट करताना रिल्स बनवताना दिसत आहेत.
![Viral Video: 'जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा', टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक; पाहा व्हिडीओ Delhi Metro Viral Video Boy enters metro wearing just towel Video viral on social media Viral Video: 'जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा', टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक; पाहा व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/08/a1ff2b582b114f819b67fb372f05150b1670503529510384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Delhi Metro Viral Video : आजकाल रिल्स (Instagram Reels) बनवण्याची क्रेझ जास्त वाढताना दिसत आहे. यासाठी लोक काहीही करताना दिसत आहेत. काही ट्रेनच्या आत डान्स (Dance Viral Video) करताना दिसत आहेत, तर काही स्टंट करताना रिल्स बनवताना दिसत आहेत. मात्र आता लोक फक्त डान्सवरच रिल्स बनवण्यावर थांबले नाही, तर याच्याही खूप पुढे गेले आहेत. अलीकडेच अनेक लोक प्रँक व्हिडीओ ( Prank Videos) बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर (Social Media Viral Video) मोठ्या प्रमाणात हे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) देखील होत आहेत. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये एक युवक टॉवेल गुंडाळून दिल्ली (Delhi) मेट्रोमध्ये (Metro) फिरताना दिसत आहे.
Delhi Metro Viral Video : लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
या व्हिडीओत (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक युवक प्रवाशांनी गजबजलेल्या दिल्ली मेट्रोमध्ये टॉवेल गुंडाळून फिरताना दिसत आहे. या व्यक्ती अगदी आरामात मेट्रोमध्ये (Delhi Metro) फिरताना दिसत आहे. मेट्रोत फिरत असताना तो कधी स्वतःला आरशात पाहता आहे, तर कधी आपल्या केसांवरून हात फिरवताना दिसत आहे. हा व्यक्ती दिल्ली (Delhi) मेट्रोमध्ये घुसताच प्रवाशी त्याला आश्चर्यचकित होऊन पाहताना दिसत आहेत. तर काही प्रवाशांना या व्यक्तीला पाहून हसू अनावर झाल्याचं या व्हिडीओत (Viral Video) दिसत आहे. लोकांच्या या प्रतिक्रियेनंतरही या व्यक्तीवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. तो अगदी आरामात दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) टॉवेलवर फिरताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडिओ (Viral Video) पाहिल्यानंतर हा व्यक्ती असा कसा मेट्रोत घुसला, असा प्रश्न लोकांना पडत आहे.
View this post on Instagram
Metro Viral Video - Boy Wearing Towel In Delhi Metro : युजर्स म्हणाले, जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा
टॉवेल गुंडाळून मेट्रोमध्ये घुसला युवक, प्रवाशांनी दिल्या अशा प्रतिक्रिया Instagram वर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या (Viral Video) कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, टाकीतील पाणी संपले आहे. आज ऑफिसमध्येच अंघोळ करेन. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आले आहेत. त्याचबरोबर 1 लाखांहून अधिक लोकांनी यावर लाईक आणि कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, भाऊ, यासाठी हिंमत हवी. तर एका दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ''जीवनात फक्त इतका आत्मविश्वास हवा.''
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)