Viral Video : देव तारी त्याला कोण मारी... एकत्र बसलेल्या कुटुंबावर पडला चालता पंखा, पुढे काय घडलं? तुम्हीच पाहा...
Trending Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब एकत्र बसून जेवताना दिसत आहे. यावेळी अचावक त्यांच्यावर चालता पंखा पडतो. यामुळे सर्वजण चांगलेच घाबरतात.
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) कधी रोमांचक तर कधी आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होताना पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहून तर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणंही कठीण होतो. आम्ही असं का म्हणतोय हे तुम्हाला एक व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर येईल. तुम्ही देव तारी त्याला कोण मारी ही म्हण ऐकली असेल, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या म्हणीचा प्रत्यय नक्की येईल. हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला आहे.
आयपीएस अधिकारी दिपांशू काबडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक कुटुंब एकत्र जमिनीवर बसून जेवताना दिसत आहे. यावेळी अचानक छताला लावलेला पंखा खाली कोसळतो. नशीब बलवत्तर म्हणून कुटुंबातील कुणालाही इजा होतं नाही. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
जाको राखे साइयां मार सके न कोय.... pic.twitter.com/kLSDuOzEoJ
— Dipanshu Kabra (@ipskabra) June 29, 2022
छताचा पंखा कोसळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंख्या खालीच एक लहान मुलगा बसलेला दिसत आहे. यानंतर पंखा अचानक खाली पडतो. पण मुलाला जराही इजा होत नाही. पंखा खाली कोसळल्यानंतर सर्वजण घाबरतात. मुलाची आई पटकन त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठीत घेते.
आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ
दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'जाको राखे साइयां मार सके न कोय...' या व्हिडीओमध्ये सहा जणांचं कुटुंब जमिनीवर चटईवर बसून एकमेकांशी बोलत असताना रात्रीचं जेवण करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्हांलाही आश्चर्य वाटेल.
पंखा पडल्यावर घाबरलं कुटुंब
जेवताना अचानक एका लहान मुलाला आवाज ऐकू येतो आणि तो आजूबाजूला पाहू लागतो. काही सेकंदांनंतर हॉलमध्ये लावलेला पंखा मुलाच्या आणि त्याच्या शेजारी बसलेल्या दोघांच्या मांडीवर पडचो. हे पाहून आई तिच्या जागेवरून उठते आणि लहान मुलाला मिठी मारते.
संबंधित इतर बातम्या