एक्स्प्लोर

GK: वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानाच्या शेवटी असतात चार रंगाचे डॉट; याचा अर्थ माहीत आहे?

Newspaper Bottom Color: तुम्ही वर्तमानपत्र वाचताना अनेकदा प्रत्येक पानाच्या शेवटी चार रंगांचे टिंब पाहिले असतील. पण ते का दिले जातात हे तुम्हाला माहीत आहे का? आज याबद्दल थोडं जाणून घेऊया.

Newspaper Four Colour Dots: काही जणांना अनेक गोष्टींच्या सवयी असतात. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करायचं? हे रोजचं ठरलेलं असतं. आता या सर्वातील एक सवय म्हणजे, रोज उठून वर्तमानपत्र (Newspaper) वाचणे. घरातील ज्येष्ठांना तर सकाळच्या चहासोबत हातात वाचायला वर्तमानपत्र लागतंच, त्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

तुम्हीही वर्तमानपत्र वाचत असाल, पण या दरम्यान वर्तमानपत्राच्या शेवटी असणाऱ्या चार रंगांच्या ठिपक्यांकडे (Four Coloured Dots) कधी तुमचं लक्ष गेलं का? आणि गेलं असेल तर हे ठिपके प्रत्येक पानाच्या शेवटी का बरं दिले जातात? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला का? अनेक वेळा आपल्यासमोर अशा गोष्टी येतात, ज्याची उत्तरं आपल्याला माहिती नसतात. उत्तर मिळत नाही तोपर्यंत 'हे असं का असावं?' हा प्रश्न आपल्या मनात घर करुन राहतो. आज अशाच एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.

वर्तमानपत्रावरील चार रंगांच्या ठिपक्यांचा अर्थ काय?

वर्तमानपत्राच्या प्रत्येक पानाच्या शेवटी दिसणाऱ्या या चार रंगांच्या ठिपक्यांना 'कलर रेजिस्ट्रेशन मार्क्स' किंवा 'क्रॉप मार्क्स' म्हणतात. हे रंग अनुक्रमे असतात - निळा, गुलाबी, पिवळा आणि काळा. इंग्रजीत या रंगांना CMYK असंही म्हणतात, ज्याचा फुल फॉर्म आहे - Cyan, Magenta, Yellow, Black. यातील Black हा रंग K (Key) या अक्षराने दर्शवला जातो.

वर्तमानपत्रात का दिले जातात हे चार रंगांचे ठिपके?

आता या क्षेत्रातील तज्ज्ञांना CMYK बद्दल माहीत असेल. पण ज्यांना याबद्दल माहीत नाही त्यांच्यासाठी सांगायचं झालं तर हे 4 बेस कलर आहेत. वर्तमानपत्रात दिसणारा कोणताही रंग हा या 4 रंगांच्या कॉम्बिनेशनमधून तयार केला जातो. प्रिंटीग करताना प्रिंट योग्य जागी आणि एका रेषेत आहे ना, हे पाहण्यासाठी या रंगांची मदत घेतली जाते.
 
जेव्हा वृत्तपत्राची छपाई सुरु होते, तेव्हा प्रिंट काढणारा व्यक्ती हे डॉट पाहतो. जर हे डॉट ठीक येत नसतील तर वृत्तपत्रात छापले जाणारे फोटो देखील खराब येतात, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे छपाई करणारा व्यक्ती वृत्तपत्राच्या तळाशी असलेले हे चार डॉट तपासून पाहत असतो. थोडक्यात वृत्तपत्रावरील हे ठिपके वृत्तपत्रावर योग्य कलर पॅटर्न बनवण्यासाठी डॉट मार्कर म्हणून काम करतात.

हेही वाचा:

Facts: सैन्याचं प्रशिक्षण घेऊन भारताच्या 'या' शहरात येतात इस्रायली ज्यू; जाणून घ्या कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indapur Harshwardhan Patil : इंदापुरातील कार्यक्रमातच हर्षवर्धन पाटलांना प्रेक्षकांमध्ये बसवलं!ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSaif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणारABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार; अंतरवाली सराटीत उपोषणाला बसताच मनोज जरांगेंची तोफ धडाडली
Mumbai Fire: मालाडच्या खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आकाश काळ्या धुराच्या लोटांनी व्यापून गेलं
मालाडमध्ये फर्निचरच्या गोदामांनी पेट घेतला, आग पसरल्याने पोलिसांनी खडकपाडा परिसर खाली केला
Mumbai vs Jammu Kashmir : शार्दूल ठाकूर- तनुष कोटियन लढले पण जम्मू काश्मीरचा पलटवार,  मुंबईच्या अडचणी वाढल्या
मुंबईच्या अडचणींचा डोंगर वाढला, जम्मू काश्मीरचा पलटवार, शार्दूल ठाकूर गोलंदाजीच्या जोरावर संघाला वाचवणार?
Allahabad High Court on Live in Relationship : 'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
'जबाबदारी टाळण्यासाठी तरुण लिव्ह-इनमध्ये, तुम्ही 6 वर्षे एकत्र, आता तक्रार का करताय?' पीडितावर उच्च न्यायालयाचे कडक ताशेरे
Indian Immigrants Around The World : गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
गेल्या पाच वर्षात तब्बल साडे आठ लाख भारतीयांचा देशाला अखेरचा रामराम! अमेरिकेत आता नाकाबंदी, मग कोणत्या देशांना प्राधान्य देत आहेत?
Ladki Bahin Yojana : सरकारनं शब्द पाळला, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
बँक खातं चेक करा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात,पहिल्या दिवशी किती महिलांना लाभ?
Bhandara Ordance Factory Blast : भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरी स्फोटाच्या चौकशीसाठी SIT स्थापन; 9 सदस्यीय समिती करणार दुर्घटनेची चौकशी
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Embed widget