(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Airplane : विमानाच्या इंजिनवर कोंबड्या का फेकल्या जातात? अंधश्रद्धा... लॉजिक की अफवा? जाणून घ्या काय आहे सत्य
Airplane Engine Chicken: विमानाच्या प्रवासासंबंधी नियमांसोबत अनेक अफवाही व्हायरल होतात, मग त्यावरुन अनेकदा गोंधळ उडतो.
Airplane : तुम्ही अनेकदा विमान प्रवास केला असेल आणि त्या संदर्भात अनेक गोष्टीही तुम्ही ऐकल्या असतील. फ्लाइट मेकॅनिझमपासून त्याच्या नियमांपर्यंत, इंटरनेटवर वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून सोशल मीडियावर बरीच माहिती शेअर केली जाते. यामध्ये काही इंटरेस्टिंग माहितीही शेअर केली जाते. त्यामध्ये विमानाच्या उड्डाणाआगोदर त्याच्या इंजिनवर कोंबड्या फेकल्या जातात ही एक माहिती. विमानाच्या इंजिनमध्ये कोंबड्या का फेकल्या जातात, किंवा कोंबड्या इंजिनवर टाकण्यामागे काही लॉजिक आहे का? ही गोष्ट खरी आहे की अफवा आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
विमानाच्या इंजिनवर खरंच कोंबड्या टाकतात का?
विमानाच्या इंजिनवर कोंबड्या फेकल्या जातात ही गोष्ट जर तुमच्या कानावर आली असेल तर ती खरी आहे. वास्तविक, विमानाच्या इंजिनची चाचणी घेण्यासाठी ही गोष्ट केली जाते. पक्षी विमानावर आदळल्यानंतर, त्याच्या पंखांवर आदळल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो याची चाचपणी करण्यासाठी ही गोष्ट केली जाते आणि ही चाचणी आवश्यक असते. विमान हवेत असताना, किंवा उड्डाण घेत असताना अनेकदा त्याच्या पंख्यांना किंवा इंजिनला पक्षांची धडक होते. त्यामुळे काही अपघात होऊ नये यासाठी विमान प्रशासनाकडून काळजी घेतली जाते, त्याचाच हा एक भाग आहे.
Airplane Engine Chicken: कशी केली जाते ही चाचणी?
ही चाचणी एका विशिष्ट प्रकारच्या बर्ड गन किंवा बर्ड कॅननने केली जाते. त्यात अनेक कोंबड्यांचा समावेश असतो. त्या माध्यमातून पक्षांच्या थव्याप्रमाणे फ्लाइट इंजिनमध्ये एकाच वेळी कोंबड्या उडवल्या जातात आणि हे इंजिन त्या परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असेल की नाही हे पाहिले जाते. ही गोष्ट विंड शील्ड आणि इंजिन या दोन्हीवर केले जाते.
अशा प्रकारची चाचणी सर्वप्रथम 1950 च्या दशकात हर्टफोर्डशायरच्या डी हॅविलँड एअरक्राफ्टमध्ये केली गेली होती. या प्रक्रियेत मेलेल्या कोंबड्यांचा वापर करून इंजिनला आग लागली जाते का नाही हे पाहिले जाते. यासाठी दोन ते चार किलोपर्यंतची कोंबडी विंड शील्डमध्ये टाकली जाते. हे टेक ऑफ थ्रस्टच्या काळात केले जाते आणि ही एक अतिशय प्रसिद्ध आणि महत्त्वाची चाचणी आहे. जर तुम्हाला या चाचणीबद्दल सांगितले गेले तर तुम्हाला आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण ती अगदी सामान्य आहे.
ही बातमी वाचा: