Aircraft Viral Video: विमान विजेच्या खांबाला धडकले, पायलटच्या हुशारीमुळे टळली मोठी दुर्घटना, व्हिडीओ व्हायरल
Aircraft Viral Video : विमान अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जे पाहून नेटकरी हादरले.
Aircraft Viral Video : विमान अपघाताचा (Aircraft Viral Video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video On Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका हायवेजवळ एक छोटे विमान कोसळताना दिसले, मात्र केवळ पायलटच्या हुशारीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हा व्हिडिओ वॉशिंग्टन जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काय घडले नेमके?
व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी हादरले.
कधी कधी असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. जे पाहून यूजर्सना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. त्याच वेळी, असे व्हिडीओ अनेकदा यूजर्सना धक्का देतात. नुकताच असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.. जे पाहून नेटकरी हादरले. विमान अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका हायवेजवळ एक छोटे विमान कोसळताना दाखवले आहे. हा व्हिडीओ वॉशिंग्टन जवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. विमान नियंत्रणाबाहेर गेल्याने पायलट विमानाला सुरक्षितपणे उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. मात्र विजेच्या खांबाला धडकल्यानंतर विमानाला आग लागली.
View this post on Instagram
विजेच्या उंच खांबाला आदळले विमान
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर नावाच्या इंस्टाग्राम पेजवर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये, अर्जेंटिनाच्या एरो क्लबच्या 75 व्या वर्धापन दिनादरम्यान एक लहान विमान जमिनीच्या अगदी जवळून उडत असताना एका विजेच्या उंच खांबाला आदळताना दिसत आहे. जे पाहून सोशल मीडिया यूजर्सला चांगलाच धक्का बसला आहे.
पायलटच्या हुशारीमुळे टळला अपघात
खांबाजवळून जात असताना विमानाचा एक पंख त्याच्यावर आदळला आणि त्याचे तुकडे वेगळे झाले. हे पाहून तेथे उभे असलेले लोक घाबरले आणि आरडाओरडा करू लागले. व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून येते की पायलटने त्याच्या विमानावर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे हे विमान नंतर सुरक्षितपणे उतरविण्यात आले. व्हायरल व्हिडीओला सोशल मीडियावर एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Viral Video : रस्त्यावर धुम्रपान केल्याची मिळाली कडक शिक्षा, व्हिडीओ पाहून हसू आवरता येणार नाही