(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रायव्हेट पार्टला विंचू चावला; कर्माचाऱ्यांना सांगताच हसू लागले, फोटो काढले अन् हॉटेलवर गुन्हा दाखल
अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका हॉटेलमध्ये सदर व्यक्ती थांबला होता.
अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका हॉटेलमध्ये एक माणूस थांबला होता. एका विंचूने या व्यक्तीला रात्री त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दंश केला. या घटनेनंतर त्या व्यक्तीला शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी येत होत्या. यानंतर या व्यक्तीने हॉटेलवर गुन्हा दाखल करून गंभीर आरोप केले आहेत.
हॉटेलमध्ये थांबलेल्या एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला विंचू चावल्याची घटना अमेरिकेतील लास वेगासमध्ये घडली. या घटनेनंतर त्या व्यक्तीला शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी आल्याने त्याने थेट हॉटेलवर गुन्हा दाखल करत नुकसान भरपाईची मागणी केल्याने याची चर्चा होत आहे.
नेमकं प्रकरण काय?
अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका हॉटेलमध्ये सदर व्यक्ती थांबला होता. यावेळी अचानक त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना होऊ लागल्या. त्याने तपासणी केली तेव्हा त्याला असे आढळले की बेडवर एक विंचू असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला विंचू प्रायव्हेट पार्टला चावल्याचे दिसून आले. यावेळी विंचू दंश केलेल्या सदर व्यक्तीने फोटोही घेतले होते. या घटनेमुळे मी मानसिक समस्यांना तोंड देत असून, शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्याने कोर्टात म्हटले. तसेच या घटनेमुळे माझ्या कुटुंबावर, माझ्या कामावर, सर्व गोष्टींवर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यातील उपचाराचा खर्च, मानसिक तणाव, वेदना आणि त्रास तसंच जीवनाचा आनंद गमावून बसलो आहे.’ न्याय मिळावा, यासाठी मी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सदर व्यक्तीने दिली.
लैंगिक जीवनावर परिणाम-
जेव्हा त्यांनी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना विंचूबाबत माहिती दिली, तेव्हा ते विनोद करत होते आणि हसत होते, असा आरोपही 62 वर्षीय व्यक्तीने केला आहे. विंचू चावल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. सदर व्यक्तीची याचिका दाखल करणाऱ्या वकिलाचे म्हणणे आहे की, या घटनेनंतर तिच्या लैंगिक जीवनावर परिणाम झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली आहे. कोणत्याही ग्राहकाला स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी रूम उपलब्ध करून देणं हे हॉटेलचं कर्तव्य आहे. मात्र हॉटेलला तसं करण्यात अपयश आलं. हॉटेलवाल्यांनीही याची गांभीर्याने दखल घेतली नाही, त्यामुळे आता नुकसान भरपाईसाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
संबंधित बातमी:
भारतीय बॅडमिंटनची 'फुलराणी' निवृत्ती घेण्याच्या विचारात; सायना नेहवाल गंभीर आजाराने त्रस्त