ABP Majha Top 10, 3 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 3 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
SSC-HSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान
SSC Exam : दहावी बोर्डाच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना सोमवारी 6 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जातील. Read More
Viral News : 'येथे' गोरं बाळ जन्माला येणं अशुभ, जन्मत:च करतात बाळाची हत्या; भारतात 'या' ठिकाणी आहे क्रूर परंपरा
Andaman Jarawa Tribe : अंदमानमधील जारवा आदिवासी जमातीमध्ये गोऱ्या रंगाचं बाळ अशुभ मानून त्याची हत्या केली जाते. जारवा जमात जगातील सर्वात जुन्या समुदायापैकी एक आहे. Read More
Budget Session 2023 : अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब
Budget Session 2023: अदानींच्या मुद्द्यावरून आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली Read More
World's Most Expensive Coffee : 'या' पक्षाच्या विष्ठेपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी, एक किलोची किमत iPhone एवढी
Most Expensive Coffee : जाकू बर्ड कॉफीची (Jacu Bird Coffee) किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. Read More
Car Accident : मुंबई-नाशिक हायवेवर प्राजक्त देशमुखच्या गाडीचा अपघात; थोडक्यात अनर्थ टळला
Nashik-Mumbai Highway : मुंबईहून नाशिकला जाताना एका अवजड वाहनाच्या बेशिस्तपणामुळे प्राजक्त देशमुखच्या कारचा अपघात झाला आहे. Read More
K. Viswanath Passes Away: तेलगू-हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
K. Viswanath Passes Away : तेलगू-हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के. विश्वनाथ (K. Viswanath) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 1992 साली विश्वनाथ यांना चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. Read More
Lionel Messi : लिओनेल मेस्सी निवृत्ती घेतोय? म्हणाला, 'मी माझ्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं आहे, आता...'
Lionel Messi Retirement Hint: : लिओनल मेस्सीने डिसेंबर 2022 मध्येच त्याच्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली होती. Read More
Khelo India Youth Games : विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र खो-खो संघ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात
Khelo India : राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून दिली. Read More
Health Tips : लहान वयातच हाय बीपीचा त्रास होतो? वेळीच सावध व्हा, अन्यथा 'या' आजाराला बळी पडू शकता
High BP Symptoms : तरुण आणि वृद्धांमध्ये उच्च रक्तदाब सुरू होण्याची कारणे खूप भिन्न आहेत. Read More
Adani Group : अदानी शेअर्स पुन्हा गडगडले, सलग सातव्या दिवशी घसरण सुरुच, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर
Gautam Adani Net Worth Fall : गौतम अदानी यांनी मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. चालू आठवड्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अदानी शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत. Read More