Budget Session 2023 : अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब
Budget Session 2023: अदानींच्या मुद्द्यावरून आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली
![Budget Session 2023 : अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब Parliament latest Updates Both Houses adjourned over adani hindenburg row Budget Session 2023 : अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/03/32ad1622c3d5fd939768e3f80fbdbe11167540849368489_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : अदानींच्या (Adani) मुद्द्यावरुन सर्व विरोधकांनी संसदेत स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली आहे. सध्या अर्थसंकल्प आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल त्यानंतर अदानींबाबत चर्चेसाठी वेगळा वेळ दिला जाईल असे लोकसभा अध्यक्षांनी म्हटल्यानंतर विरोधकांकडून सदनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला. गदारोळानंतर दोन्ही सभागृहातील कामकाज तहकूब करण्यात आले आहे. लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
अदानींच्या मुद्द्यावरुन आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली. सदनातील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत सकाळी विरोधकांची बैठक देखील झाली. या बैठकीत 16 पक्षाचे नेते सहभागी झाले होते. खर्गे यांच्या कक्षात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत कॉंग्रेस, डीएमके, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, भारत राष्ट्र समिती, शिवसेना, राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड, सीपीआय (एम), सीपीआय, एनसीपी, नॅशनल कॉन्फरन्स, इंडियन यूनिअन मुस्लिम लीग, केसी (जोस मणी), केसी (थॉमस) आणि आरएसपी हे पक्ष सहभागी झाले होते.
एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर काँग्रेस निदर्शने करणार
गुरूवारी हिंडनबर्ग रिसर्चनंतर संसदेत अदानीच्या मुद्द्यावर लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ झाला. दरम्यान 6 फेब्रुवारीला देशातील सर्व जिल्ह्यात एलआयसी आणि एसबीआय कार्यालयासमोर कॉंग्रेस निदर्शने करणार आहेत.
अदानी एंटरप्रायझेसचा
अदानींचं किती झालं नुकसान?
- हिंडनबर्गच्या अहवालामुळे गेल्या 6 दिवसातच अदानी समुहातील 8.3 लाख कोटींची गंगाजळी कमी केली आहे
- अदानी समुहातील सर्व 10 कंपन्यांचे बाजार भांडवल आतापर्यंत 43 टक्के घटले आहे
- सहा दिवसांआधी श्रीमंतांच्या यादीत असलेले अदानी 22 व्या स्थानी पोहोचलेत
- सोबतच जागतिक बॅंकर्स क्रेडिट सुइस आणि सिटी ग्रुपने कर्जासाठी तारण म्हणून अदानी बाँड स्वीकारणे बंद केले आहे
हिंडनबर्गचा रिपोर्ट काय होता?
- अदानी समूह आपल्या शेअर्सचे भाव स्वत: वाढवतो असा आरोप आहे
- गौतम अदानी यांच्या संपत्तीत मागील तीन वर्षात अनेक पटीने वाढ
- अदानी समुहाच्या 7 लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सचे भाव सरासरी 819 टक्क्यांनी वाढले आहेत
- येत्या काळात अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव 85 टक्के पडू शकतात
- अदानी समुहातील कंपन्यांवर कर्ज अधिक आहे आणि अधिक शेअर्स गहाण ठेवले आहेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)