Nagpur Accident : हॅन्डपंपवर पाणी पिण्यासाठी गेली अन् बोलेरोने दिली धडक
देवकाबाई नेहमीप्रमाणे हॅन्डपंपवर पाणी भरत होत्या. यावेळी मेंढला फाट्याकडुन मेंढला गावाच्या दिशेने वेगात येत असलेल्या MH40BL9406 या क्रमांकाच्या मालवाहु बोलेरोने त्यांना जोरात धडक दिली.

नागपूरः नरखेड तालुक्यातील मेंढला बस्थानकावर वेगात आलेल्या मालवाहु बोलेरोने पिण्याचे पाणी हंन्डपंप वरून घेऊन जाणाऱ्या महिलेला उडवित रोडलगत उभ्या असलेल्या मोटरसायकलचा चुराडा केला. या अपघातात पानटपरीचालक थोडक्यात बचावला. तर पानटपरीचे नुकसान झाले आहे. ही घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस स्टेशन अंर्तगत मेंढला येथे घडली. देवकाबाई रामकृष्ण अलोणे वय (77) राहणार मेंढला असे मृत महिलेचे नाव आहे. मेंढला येथील बसस्थानकावर पंक्चर दुरुस्तीच्या दुकानाला लागून सार्वजनिक हॅन्डपंप आहे. देवकाबाई नेहमी तेथून पाणी भरतात. नेहमीप्रमाणे त्या पाणी भरत होत्या. यावेळी मेंढला फाट्याकडुन मेंढला गावाच्या दिशेने वेगात येत असलेल्या MH40BL9406 या क्रमांकाच्या मालवाहु बोलेरोने त्यांना जोरात धडक दिली. त्यानंतर त्याच बोलेरोने रोडच्या बाजुला पानटपरी जवळ उभ्या असलेल्या MH40 CG 0175 या मोटरसायकलला धडक दिली. या वेगात झालेल्या अपघातामुळे मोटरसायकलचा चुराडा झाला.
अपघातानंतर देवकाबाई यांना जखमी अवस्थेत मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी मिथुन घोलपे यांनी त्यांना मृत घोषीत केले. माहिती मिळताच जलालखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज चौधरी यांनी घटनास्थळ गाठुन मृतदेह ताब्यात घेऊन, उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. याप्रकरणी जलालखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज चौधरी यांनी वाहनचालक गजानन भाऊराव चरपे (वय 32, रा.मेंढला) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून वाहन जप्त केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : 'मध्यावधी व्हायला हवी, चुकलो असेल तर जनता घरी बसवेल'; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे
Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू
Hanuman Chalisa : भोपाळमध्ये विद्यापीठात हनुमान चालिसा पठण केल्याने 5-5 हजारांचा दंड, राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश
Phone Tapping : मविआ स्थापनेवेळी झालेल्या फोन टॅपिंग कांडावरील कारवाई अजूनही प्रलंबित, पण संजय पांडे निवृत्त होताच सीबीआयच्या जाळ्यात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
