Uddhav Thackeray : 'मध्यावधी व्हायला हवी, चुकलो असेल तर जनता घरी बसवेल'; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे
Uddhav Thackeray Highlights : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. यात प्रामुख्यानं त्यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे.
Uddhav Thackeray Press Conference : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. यात प्रामुख्यानं त्यांनी निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टपणे भाष्य केले आहे. 'धनुष्य बाण' हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे 'धनुष्य बाण' कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे मी ठामपणे सांगत आहे. आम्ही घटनातज्ज्ञ, कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून हे वक्तव्य करत असल्याचे उद्धव यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या संबोधनातील दहा महत्वाचे मुद्दे
- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा द्यायचा की नाही हा निर्णय खासदारांशी बोलूनच घेणार
- वारकऱ्यांनी मला पंढरपूरला बोलावलं आहे. हा गदारोळ संपला की पंढरपूरला जाईल. माझ्या हृदयात विठुमाऊली नेहमीच आहे.
- आजही सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत. भावना आणि दु:ख मलाही आहे, पण शिवसैनिकांवरील ताण वाढवायचा नाही.
- धनुष्यबाण कुणीही हिरावून घेणार नाही. चिन्हाबाबत कायदे तज्ञांशी चर्चा केली आहे. माझा कायद्यावर आणि लोकशाहीवर विश्वास आहे.
- 11 जुलैच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. कोर्टाच्या निकालाची चिंता नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल याचा विश्वास आहे. हा निकाल देशाला दिशा देणारा असेल.
- आमच्याबद्दल प्रेम दाखवणाऱ्यांची दोन वर्ष दातखीळ बसली होती का. आमच्यावर टीका झाली तेव्हा यांचं प्रेम का दिसलं नाही. आमच्यावर टीका असताना गप्प का होतात.
- भाजपनं जे आज केलं आहे ते अडीच वर्षांपूर्वी केलं असतं तर महाविकास आघाडी निर्माण झाली नसती.
- मी आजही म्हणतोय की हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मध्यावधी व्हायला हवी, चुकलो असेल तर जनता घरी बसवेल
- मला या गोष्टीचा अभिमान आहे की सामान्य लोकांना शिवसेनेनं मोठं केलं. जे लोक मोठे झाले ते गेले. त्यांना जाऊ द्या, मात्र आजही अनेक लोक शिवसेनेसोबत आहेत.
- कितीही आमदार जाऊ द्या मात्र पक्ष आपलाच राहील. विधिमंडळ वेगळं असतं आणि पक्ष संघटन वेगळं असतं.