Thane Water Cut: शुक्रवारी ठाण्यात पाणीपुरवठा बंद; स्टेमची जलवाहिनी अन् मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शट डाऊन
Thane Water Cut: ठाणे शहरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार असून स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Thane Water Cut: ठाणेकरांसाठी (Thane News) अत्यंत महत्त्वाची बातमी. उद्या, 26 मे 2023 शुक्रवार ठाणे शहरात पाणीपुरवठा बंद (Water Supply in Thane City) राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं (Thane Mahanagarpalika) देण्यात आलेली आहे. यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं परिपत्रकही जारी करण्यात आलं आहे. तसेच, नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा आणि महापालिकेस सहकार्य करावं, असं आवाहनही महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल दुरुस्ती आणि ठाणे महापालिकेच्या जल वाहिनीची साकेत पुलावरील दुरुस्ती या कामांमुळे शुक्रवारी 26 मे रोजी सकाळी 9 ते शनिवारी 27 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाच्या जल वाहिनीची देखभाल, दुरुस्ती यांची कामं या अवधीत केली जाणार आहेत. तसेच, ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जल वाहिनीची साकेत पूल येथे दुरुस्ती तसेच व्हॉल्व बदलेले जाणार आहेत. या कामांसाठी हा 24 तासांचा शट डाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या 24 तासांसाठी ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
दुरुस्तीच्या कामांसाठी ज्यावेळी पाणीपुरवठा बंद असेल, त्यावेळी घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, साकेत, ऋतू पार्क, कारागृह परिसर, गांधी नगर, रुस्तमजी, इंदिरा नगर, रुपादेवी, श्रीनगर, समता नगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा या भागातील पाणी पुरवठा शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9 ते शनिवारी 27 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल.
आज कोपरीत पाणी नाही
कोपरी येथील ठाणे महापालिकेच्या धोबीघाट जलकुंभाची 500 मीमी व्यासाची मुख्य जलवितरण वाहिनी विकास कामात बाधित असल्याने स्थलांतरीत करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी क्रॉस कनेक्शन घेण्यात येणार असल्याने गुरूवार 25 मे सकाळी 9 पासून ते शुक्रवार 26 मे रोजी सकाळी 9 पर्यंत 24 तासांसाठी कोपरी परिसरातील धोबीघाट आणि कन्हैयानगर जलकुंभावरुन होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच, पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होईल.