एक्स्प्लोर

Virar: विरारमध्ये इमारत कोसळली, तीन महिला मजुरांचा मृत्यू 

Virar Building Collapsed : पाच कामगार या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते, त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजूरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी 3.30 तीन वाजताची आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम चालू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

विरारमध्ये आजचा दिवस कामगारांच्या जिवावर बेतला आहे. विरार पूर्वेच्या स्टेशन जवळील स्नेहांजली इमारतीच्या बाजूला एका चालू बांधकामचं फायलिंगचं काम सुरु होतं. फायलिंगपासून चौदा फुट उंच भिंतीच काम सुरु होतं. दुपारी 3.30 च्या सुमारास अचानक एका बाजूची भिंत कोसळली. तेथे काम करणारे पाच मजूर त्या भिंतीखाली दबले गेले. या घटनेत तीन महिला मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शाहूबाई अशोक सुळे (वय 45),  लक्ष्मीबाई बालाजी गावाने (वय 45), राधाबाई एकनाथ नावघरे ( वय 40) असे मयत झालेल्या महिला कामगारांची नाव आहेत.  तर यात एक महिला नंदाबाई अशोक गव्हाणे (वय 32) आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत. त्यांना नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणी एकूण 12 मजूर काम करत होते. काही जण बाहेर निघाल्यामुळे ते वाचले.

विरारमध्ये सूर्यकिरण नावाची जुनी इमारत होती. सात वर्षापूर्वी ती पुनर्विकासासाठी बिल्डराला दिली होती. सात वर्षानंतर बिल्डरांने नवीन इमारत बांधण्यास घेतले होते. मात्र बिल्डराने सुरक्षेचे कोणतेही उपाययोजना आखल्या नव्हत्या. तसेच भिंतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप जुन्या रहिवाशांनी केला आहे. 

मृत सर्व मजूर हे नाका कामगार आहेत. हे सर्वजण मराठवाडा नांदेड, परभणी येथील मूळचे रहिवाशी आहेत. कामासाठी ते वसई, नालासोपारा, विरार परिसरात नाका कामगार म्हणून काम करीत होते. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget