(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साऊथ आफ्रिकेतील अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये फडकणार तिरंगा, ठाण्यातील 7 धावपटूंचा असणार सहभाग
Ultra Marathon, Thane : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 90 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी (दि.4) उपवन परिसरात गुडलक रनचे आयोजन करण्यात आले होते.
Ultra Marathon, Thane : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या 90 किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी (दि.4) उपवन परिसरात गुडलक रनचे आयोजन करण्यात आले होते. साउथ आफ्रिकेत होणाऱ्या या 90 किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये ठाण्यातील सात धावपटूंचा सहभाग असणार आहे. त्यासाठी धावपटूंनी पूर्वतयारी केली आहे.
कोणाचा असणार सहभाग ?
1. डॉ. महेश बेडेकर
2. रामनाथ मेंगळ
3. चिन्मय सेनगुप्ता
4. विवेक ठिलकन
5. प्रशांत सिन्हा
6.निखिल कुमारी विद्या
तिरंगा देऊन इतर धावपटूंकडून शुभेच्छा देण्यात आल्या
मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या धावपटूंना प्रथेप्रमाणे तिरंगा देऊन इतर धावपटूंकडून शुभेच्छा देण्यात आल्या. या स्पर्धेत जगभरातून 23 हजार धावपटू भाग घेत आहेत भारतातून 327 धावपटू भाग घेत आहे. "भारतीय संघाने तयार केलेला टी-शर्ट आणि जॅकेट घालून या स्पर्धेत भाग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे ",असे डॉक्टर महेश बेडेकर यांनी व्यक्त केले.
इतर महत्वाच्या बातम्या