एक्स्प्लोर

AC Bus : खुशखबर! गारेगार प्रवास आता स्वस्तात, मुंबई ते ठाणे एसी बसचं भाडं फक्त 65 रुपये

TMT AC Bus Fare Reduce : टीएमटीने (TMT) बस तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे एसी बसचं भाडं फक्त 65 रुपये असणार आहे.

Mumbai Thane AC Bus Fare : मुंबई ते ठाणे (Mumbai to Thane) यादरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. आता एसी बसचा (AC Bus) गारेगार प्रवास आणखी स्वस्त झाला आहे. ठाणे महानगर परिवहन (TMT - Thane Municipal Transport) मंडळाने एसी बसच्या तिकीटाच्या दरात कपात केला आहे. टीएमटीने (Thane Municipal Transport) बस तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे एसी बसचं भाडं फक्त 65 रुपये असणार आहे.

BEST आणि NMMT सोबत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाऊल

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर नव्याने समाविष्ट केलेल्या इलेक्ट्रिक एसी बसेस (Electric AC Bus) आणि व्होल्वो दोन्ही सेवांवर नवीन भाडे दर लागू करण्यात येईल. बेस्ट (BEST) आणि नवी मुंबई म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट (NMMT) बस सेवांमधील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. टीएमटी (TMT) बस मार्गावरील प्रवासी BEST आणि NMMT च्या स्वस्त पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. यामुळे स्वस्त पर्यायांकडे वळणाऱ्या प्रवाशांना शांत, आरामदायी आणि परवडणारा प्रवास देण्यासाठी टीएमटीने हा निर्णय घेतला आहे.

बस तिकीट दरात सुमारे 40 ते 50 टक्के कपात

सुधारित दरांनुसार, टीएमटी एसी बसचे किमान भाडे आता पहिल्या दोन किलोमीटरसाठी 20 रुपयांऐवजी 10 रुपये असेल म्हणजे यामध्ये 50 टक्के घट करण्यात आली आहे. तर कमाल भाडे 105 रुपयांवरून 105 रुपयांपर्यंत कमी करून 65 रुपये करण्यात आलं असून यामध्ये 40 टक्के कपात करण्यात आली आहे.

मुंबई ते ठाणे प्रवास आणखी सुखकर होणार

टीएमटीने लागून केलेल्या नव्या दरांमुळे प्रवाशांचा मुंबई ते ठाणे असा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. प्रवाशांना मुंबई ते ठाणे एसी बसच्या प्रवासासाठी 105 रुपये नाही तर फक्त 65 रुपये भाडं द्यावं लागेल. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आराम मिळणार आहे. शिवाय आता उन्हाळा जवळ आल्याने प्रवाशांना उन्हाच्या उकाड्यापासून वाचून एसी बसची गारेगार हवा खात स्वस्तात प्रवास करता येईल.

मुंबई ते ठाणे दरम्यान टीएमटी एसी बसचं नवीन भाडं किती?

  • सुधारित दरांनुसार, टीएमटी एसी बसचं किमान भाडे आता पहिल्या दोन किलोमीटरसाठी 20 रुपयांऐवजी 10 रुपये असेल
  • कमाल भाडे 105 रुपयांवरून 65 रुपये करण्यात आलं आहे.

दरम्यान, लवकरच प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर (RTI) भाडे सुधारणा दर सादर केले जातील. त्यानंतर हे दर लागू करण्यात येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget