Jai Jawan : 'जय जवान'ची हॅट्रिक, एकाच दिवसात तिसऱ्यांदा 10 थरांचा विक्रम
Thane News : पहिल्यांदा घाटकोपर, नंतर ठाण्यात दोन वेळा असे एकूण तीन वेळा जय जवान पथकाने दहा थरांचा विक्रम केला आहे.

Jai Jawan Govinda Pathak World Record : जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने एक विश्वविक्रम केला असून एकाच दिवसात, काही तासांच्या अतंरामध्ये तीन वेळा 10 थरांचा विश्वविक्रम केला. सकाळी घाटकोपरमध्ये तर रात्री ठाण्यामध्ये दोन वेळा दहा थरांचा विक्रम जय जवानने केला. त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाचे कौतुक केलं जात आहे.
सलग तीनवेळा 10 थर रचले
जय जवान पथकाने सकाळी घाटकोपर येथे मनसे गणेश चुक्कल, अरविंद गिते मित्र परिवार आयोजित दहीहंडीमध्ये 10 थरांची दहीहंडी रचून सर्वांना थक्क केलं. त्यानंतर रात्री ठाण्यामध्ये प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 10 थरांचा विक्रम रचला. त्यानंतर लगेच मनसेच्या अविनाश जाधव यांच्या ठाण्यातीलच दहीहंडीत तिसऱ्यांदा 10 थरांचा विक्रम रचला.
कोकण नगर गोविंदा पथकाची 10 थरांची सलामी
ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थरांची सलामी दिली.
जय जवानची घाटकोपरमध्ये 10 थरांची सलामी
कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 10 थरांचा विश्वविक्रम रचला होता. त्या विक्रमानं जय जवान पथकाला मागे टाकलं होतं खरं, पण अगदी काही तासांतच घाटकोपरमध्ये जय जवान पथकानं तोच विक्रम गाठत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं. गोविंदा पथकांचे खरे राजे आम्हीच', असा दमदार संदेश जय जवान पथकानं या थरारक कामगिरीतून दिला.
प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत 10 थरांचा विक्रम
कोकण नगरच्या विक्रमानंतर जय जवानच्या पथकाने ठाण्यातील संस्कती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये 10 थरांचा विक्रम रचला.
मनसेच्या दहीहंडीत 10 थरांचा विक्रम
प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत 10 थरांचा विक्रम रचल्यानंतर काही तासांच्या अवधीत जय जवानने पुन्हा एकदा तोच विक्रम केला. मनसेच्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडीत जय जवानने पुन्हा एकदा 10 थरांचा विक्रम केला.
कुणी कोणती हंडी फोडली?
माजी खासदार राजन विचारे यांची ठाण्यातली धर्मवीर आनंद दिघे स्मृतिप्रीत्यर्थ 1 लाख 11 हजार 111 रूपये मनाची दहीहंडी ठाण्याच्या प्रमुख पाच गोविंदा पथकांनी एकत्र येऊन फोडली. गौरीशंकर पथक, ओम साई पथक, सिद्धिविनायक पथक, श्रीनगरचा राजा पथक, साईबा गोविंदा पथक यांनी एकत्र मिळून दहीहंडी फोडली.
जय लहुजी गोविंदा पथकाने भारतातील सर्वात मोठी दहीहंडी राम कदम घाटकोपरचा मान पटकावलं असून 6 मनोरे रचत दहीहंडी फोडली आहे.
पुण्यातील पुनीत बालन यांची दहीहंडी राधाकृष्ण ग्रुप गोविंदा पथकाने 7 थर लाऊन फोडली. त्यांना एक लाख 11 हजार रुपये बक्षीस देण्यात आलं आहे.
भिवंडीतली कपिल पाटील फाउंडेशन यांची मानाची हंडी चोरोबा कोनगाव यांनी ही दहीहंडी फोडली आहे.
नवी मुंबई - ऐरोलीमधील शिवसेना उपनेते विजय चौगुले आयोजित दहीहंडी स्वराज्य गोविंदा पथक , चिंचपाडा यांनी फोडली
पिंपरी चिंचवडमध्ये चेंबूर येथील संयुक्त प्रतिष्ठान गोविंदा पथकाकडून दहीहंडी फोडण्यात आली, सात थर लावून ही दहीहंडी फोडली. राम वाकडकर युथ फाउंडेशन कडून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं होतं
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंद्वारे आयोजित बोरीवलीच्या मागाठाण्याची दहिहंडी गावदेवी मित्र मंडळाने पाच थर लाऊन फोडली.
























