हस्तमैथून करून महिलांच्या वाळत घातलेल्या अंतरवस्त्रावर वीर्य टाकणाऱ्या विकृतास पोलिसांकडून बेड्या
Thane Crime : हस्तमैथून करून महिलांच्या अंतरवस्त्रावर वीर्य टाकणाऱ्या ठाण्यातील विकृतास पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Thane Crime : हायप्रोफाइल सोसायटीतील एका इमारतीच्या टेरेसवर गुपचूप जात 20 वर्षीय विकृत तरुणाने पुरुष लैगिंक प्रक्रियेतील हस्तमैथूनाची क्रिया करून ते वीर्य सोसायटीतील महिलांच्या वाळत ठेवलेल्या अंतर वस्त्रावर टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्त्री मनास लज्जा उत्पन्न केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटिव्ही फुटेजमधून समोर आला आहे. ही घटना भिवंडीतील एका हायप्रोफाइल सोसायटीच्या टेरेसवर घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात विकृतावर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या विकृताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद रेयान मोहम्मद नफीज सिद्धीकी (वय 20)असे अटक केलेल्या विकृताचं नाव आहे.
हायप्रोफाइल सोसायटीतील एका इमारतीच्या टेरेसवर गुपचूप जात केला घृणास्पद प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 36 वर्षीय महिला ह्या भिवंडीतील एका हायप्रोफाइल सोसायटीत कुटुंबासह राहते. तर अटक आरोपी हा भिवंडीतील गैबीनगर भागात राहतो त्यातच 5 ऑक्टोबर रोजी तक्रारदार पीडित महिला राहत असलेल्या हायप्रोफाइल सोसायटीत आरोपी दुपारी 2 वाजताच्या सुमारास सोसायटीमध्ये गुपचूप प्रवेश केला. त्यानंतर इमारतीच्या टेरेसवर जाऊन सोसायटीतील महिलांनी (वाळत) सुकत घातलेल्या अंतर वस्त्रावर लैंगिक प्रक्रियेतील हस्तमैथूनाची प्रक्रिया करून त्यानंतर वीर्य वस्त्रांवर टाकले. विशेष म्हणजे या विकृताचे घृणास्पद कृत्य टेरिस वरील सिसीटिव्हीत कैद झाले होते.
36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून विकृतावर गुन्हा दाखल
दरम्यान, सोसायटीमधील काही रहिवाशांनी कामा निमित्याने सीसीटीव्ही फुटेजची 29 नोव्हेंबर रोजी तपासणी केली असता त्या फुटेजमध्ये विकृत आरोपी हा महिलांच्या अंतर वस्त्रावर वीर्य टाकताना दिसून आला. त्यामुळं सदर कृती स्त्री मनास लज्जा उत्पन्न करणारी असल्याने याप्रकरणी 36 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून विकृतावर 29 नोव्हेंबर रोजी शांतीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अनुसार कलम 79, 329 (2) अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला भिवंडी शहरातून ताब्यात घेऊन अटक केल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली असून आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपीला भिवंडी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या