27 गावांचा निकाल लावा मगच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घ्या, सुरेश म्हात्रेंची मागणी
जोपर्यंत 27 गावाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी कोर्टात करणार असल्याचे मत शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.

Suresh Mhatre : जोपर्यंत 27 गावाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी कोर्टात करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले. कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट केलेली 27 गावाच्या संघर्ष समितीने एका सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये सुरेश म्हात्रे बोलत होते. आगरी समाजाच्या तरुणांना मार्गदर्शन करताना परप्रांती आणि गुजराती कशा पद्धतीने व्यवसाय करतात याचे उदाहरण देऊन त्यांनी तरुणांना व्यवसायात व राजकारणात उतरण्यासाठी प्रोत्साहित केले.
तरुणांनी राजकारणात यायला हवे
तरुणांनी राजकारणात यायला हवे राजकारण कितीही गलिच्छ असू दे असे म्हात्रे म्हणाले. राजकारणात जेव्हा तुम्ही त्या खुर्चीत बसताना तुमच्या डोक्यात चांगलं करायची विचार असतील ना तुम्ही चांगलं करू शकता. प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्राची लोक असतात. पाची बोटं सारखी नसतात. परंतू, काही लोकांमुळं राजकारण बदनाम होतं आहे, व्यवसाय बदनाम होतो असे म्हात्रे म्हणाले. मी स्वतः रेमंडमध्ये नोकरीला होतो. 90 ते 96 नोकरी केली आहे. माझी नोकरी करण्याची अजिबात इच्छा नव्हती. नोकरी केली नाही तर लग्न होणार नाही, लग्न झाल्यावर नोकरी सोडली बायकोला सांगितले तू सांगशील ते काम करेल व्यवसाय करेल. मात्र तुला उंबऱ्याच्या बाहेर जाऊ देणार नाही असे म्हात्रे म्हणाले.
व्यवसाय कुठलाही वाईट नाही
व्यवसाय कुठलाही वाईट नाही. भैय्या चणे विकून कुटुंबाचे पोट भरतात. आपला एक माणूस दुकान टाकतो त्याचा स्वतःचा गाळा त्याला परवडत नाही तोट्यात जातो. गुजराती येतो तो गाळा भाड्याने घेतो व्यवसाय करतो आणि फायद्यात जातो असे म्हात्रे म्हणाले. मी 2009 ला विधानसभा लढलो आणि पडलो 2014 ला लोकसभा लढलो आणि पडलो 2019 ला मला तिकीट नाही मिळालं. त्यावेळेस मला शिवसेनेकडून कमेंटमेंट होती कपिल पाटलांचे तिकीट कापून तुला देतो. ही कमेंट असतानाही मला तिकीट दिले नाही मी हरलो नाही. 2019 च्या काँग्रेसच्या तिकिटाच्या माध्यमातून शरद पवार साहेबांपर्यंत मला जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी शरद पवार साहेब म्हणाले तू खूप उशीर केलास मला पवार साहेब बोलले तू असेच काम चालू ठेव भविष्यात तू खासदार होशील. तू कुठल्याही पक्षात राहा माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही. त्यामुळं आपण सगळे सोबत राहू मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सगळ्यांना विनंती करू आणि आपलं काम करु असे म्हात्रे म्हणाले.
एखादा व्यक्ती महापालिकेत गेला तर त्याला महापालिका सांगते सुप्रीम कोर्टात केस चालू आहे. अरे केस चालू आहे तर आमच्या निवडणुका कशा लावता थांबा ना. तीन ते चार वर्षे निवडणुका थांबल्या त्या कशामुळे? सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे थांबल्या ना. त्या सुप्रीम कोर्टाने आमचा निर्णय द्यावा जोपर्यंत तो निर्णय येत नाही तोपर्यंत इथल्या निवडणुका स्थगित करण्यात याव्यात अशी मागणी आम्ही करणार आहोत असे म्हात्रे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Suresh Mhatre: भिवंडीला बीड-परभणी बनवायचंय का? तडीपार गुंड मोकाट; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, खासदार सुरेश म्हात्रेंचा हल्लाबोल























