(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, त्रस्त रिक्षाचालकांसह नागरिकांचे उपोषण
Kalyan News: कल्याण-मुरबाड-नगर रोडवर म्हारळ ते पाचवा मैल पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः दैना उडाली आहे. चार किलोमीटर पर्यंत असलेल्या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांसह नागरिक देखील त्रस्त झालेत.
Kalyan News: कल्याण-मुरबाड-नगर रोडवर म्हारळ ते पाचवा मैल पर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः दैना उडाली आहे. चार किलोमीटर पर्यंत असलेल्या खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांसह नागरिक देखील त्रस्त झालेत. या रस्त्याचे काँक्रीटीकरनाचं काम देखील अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काँक्रिटकरणाच काम जेव्हा करायचं, तेव्हा करा. तोपर्यंत या रस्त्याची डांबरीकरण करण्याची मागणी येथील नागरिक गेल्या दोन वर्षांपासून करत आहेत. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अखेर या विरोधात आज रिक्षाचालक व ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.
कल्याण-मुरबाड-नगर हा राष्ट्रीय महामार्ग कल्याण आणि नगरला जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. नगरहून येणारी किंवा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक, परिसरातील शाळा, कॉलेज, गावे यामुळे 24 तास या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरूच असते. या रस्त्यावरील म्हारळपाडा ते पाचवा मैल या चार किलोमीटरच्या अंतरात रस्त्यावर खड्डेच-खड्डे दिसून येत आहे. काही ठिकाणी तर रस्ता पावसाच्या पाण्याने अक्षरक्ष: वाहून गेला आहे. या रस्त्याचे काँक्रिटकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. म्हारल गाव ते पाचवा मैल पर्यंतच्या या चार किलोमीटरच्या रस्त्यावर पावसामुळे यंदा देखील मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरती कसरत करावी लागते. गेल्या दोन वर्षांपासून काँक्रीट करण्यासाठी काम होईपर्यंत, या रस्त्याचा डांबरीकरण करावं, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र अद्यापही राष्ट्रीय महामार्ग विभागाचा याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येतंय.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून ही समस्या भेडसावत असून याबाबत अनेकदा नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र अद्यापही हे खड्डे बुजवण्याची तसदी या संबंधित विभागाने घेतलेली नाही. त्यामुळे आज त्रस्त नागरिकांनी याच परिसरात आमरण उपोषण सुरू केलंय. या रस्त्याचा काँक्रिटीकरण जलद गतीने करा व जोपर्यंत काँक्रिटीकरण होत नाही, तोपर्यंत या चार किलोमीटरचा रस्त्याचं डांबरीकरण करावे, अशी मागणी या नागरिकांनी या केली. दरम्यान उपोषण स्थळी युवासेना जिल्हाआधिकारी व केडीएमसीचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी देखील भेट दिली. यावेळी त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात-लवकर काम करण्याचा तसेच उर्वरित रस्त्याचा डांबरीकरण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. याबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेताना घेणार असल्यास त्यांनी सांगितलं आहे.