Eknath Shinde: 'कडक, रुबाबदार पाहिजे...'; PM नरेंद्र मोदींसाठी स्वत: एकनाथ शिंदे फेटा निवडतात तेव्हा..., Video
Narendra Modi Thane Visit: ठाण्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम उद्या होणार आहे. त्यासाठी नरेंद्र मोदी देखील येणार आहेत.
Eknath Shinde Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्या (शनिवारी 5 ऑक्टोबर) ठाणे दौऱ्यावर येणार आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते अनेक विकास कामांचं भूमिपूजन, अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि विविध योजनांचा शुभारंभ होणार आहे. नरेंद्र मोदी ठाण्यात येत आहेत, हे ठाणेकरांसाठी गौरवाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) दौऱ्याआधी ठाण्याचा कासर वडवली येथे सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रात्री दीड वाजता सभास्थळाच्या ठिकाणी दौरा केला. एकनाथ शिंदेंनी स्वतः प्रत्येक ठिकाणची पाहणी केली. रात्रीच्या जवळपास 1.30 ते 2 वाजताच्या सुमारास एकनाथ शिंदे कासारवडवली येथे सभास्थळी स्वतः उभे राहून प्रत्यक्ष पाहणी करत होते. कुठलीही कमतरता राहू नये त्यासाठी एकनाथ शिंदेंनी संबंधित अधिकारी, कार्यकर्त्यांना निर्देश दिले.
PM मोदींसाठी स्वत: फेटा निवडला-
एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वत: फेटा निवडला. यावेळी फेटा निवडताना कडक, रुबाबदार फेटा पाहिजे, असं एकनाथ शिंदे बोलताना दिसले. तसेच फेटा बघून काहीतरी एकनाथ शिंदेंनी काही सूचना दिल्या.
एकनाथ शिंदे का म्हणाले?
पंतप्रधान हे विश्वात लोकप्रियतेमध्ये नंबर एकवर आहेत आणि ते ठाण्यात येत आहेत. खरं म्हटलं तर ठाण्याचं बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. आता ठाणे बदलत आहे. ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प होत आहेत आणि आता नरेंद्र मोदी काही प्रकल्पाच्या शुभारंभ त्यात मेट्रो असेल, रस्ते असेल आणि इतर प्रकल्पाचा, अनेक योजना आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सारख्या अनेक योजना आहेत, ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट लेटर असे अनेक उपक्रम उद्या नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत. खरं म्हटलं तर नरेंद्र मोदी ठाण्यामध्ये येण्यामुळे ठाण्याच्या महत्त्व वाढेल. ठाणे आता देशाच्याच नव्हे तर जगात जगाचा नकाशावर आहे. ठाण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ दिल्यामुळे मी त्यांना धन्यवाद करतो ,आभार व्यक्त करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी, महायुतीनंतर तिसरी आघाडीही मैदानात-
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये तगडी फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे. कारण महायुतीतील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील 3 पक्ष आमने-सामने असणार आहेत. शिवाय, शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने अनेक विधानसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी एकाच आघाडीत आहेत. त्यामुळे अनेक पक्षांमध्ये बंडखोर उभे राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही असणार आहे. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय, मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे हे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.