Vande Bharat Express: मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला कल्याण येथे मिळणार थांबा : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
Vande Bharat Express: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस मधील महाराष्ट्रात दोन एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. त्यापैकी मुंबई-शिर्डी एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा आहे. परंतु मुंबई-सोलापूर या एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा नाही.
Vande Bharat Express: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस मधील महाराष्ट्रात दोन एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. त्यापैकी मुंबई-शिर्डी एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा आहे. परंतु मुंबई-सोलापूर या एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा नाही. मात्र आता लवकरच मुंबई-सोलापूर एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा मिळणार आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, ''यासाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील असून रेल्वे मंत्रालय व रेल्वे प्रशासना सोबत बैठकीत ही मागणी लावून धरल्याने त्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. लवकरच कल्याण या ठिकाणी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा मिळणार असून याचा फायदा कल्याणसह समस्त ठाणे जिल्ह्यातील नागरीकांना होणार आहे.''
मुंबई - सोलापूर आणि मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनला उत्स्फूर्त प्रतिसाद, 1 लाख प्रवासी संख्या पार
- मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (mumbai solapur vande bharat express ) आणि मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने 32 दिवसांच्या कालावधीत 1,00,259 प्रवाशांची वाहतूक केली आहे. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झाल्यापासून या गाड्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे रु.8.60 कोटींची महसूल जमा झाला आहे.
- 22225 मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथील 26,028 प्रवासी संख्येतून रु.2.07 कोटी महसूलाची नोंद केली.
- 22226 सोलापूर - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, कुर्डूवाडी आणि पुणे येथील 27,520 प्रवासी संख्येतून रु.2.23 कोटींचा महसूल नोंदविला.
- 22223 मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि नाशिक रोड येथील 23,296 प्रवाशांच्या संख्येतून 2.05 कोटी रुपयांची महसूलाची नोंद केली.
- 22224 साईनगर शिर्डी - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने साईनगर शिर्डी आणि नाशिकरोड येथून 23,415 प्रवाशांच्या संख्येतून रु.2.25 कोटी महसूलाची नोंद केली.
वंदे भारत ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड वाय-फाय इन्फोटेनमेंट, GPS आधारित प्रवासी माहिती प्रणाली, प्लश इंटिरियर्स, टच फ्री सुविधांसह बायो-व्हॅक्यूम टॉयलेट्स, डिफ्यूज्ड एलईडी लाइटिंग, प्रत्येक सीटच्या खाली चार्जिंग पॉइंट्स, वैयक्तिक टच-आधारित वाचन दिवे आणि लपविलेले रोलर पट्ट्या (concealed roller blindsblinds) यासारख्या उत्कृष्ट प्रवासी सुविधा आहेत. जंतूमुक्त हवेच्या पुरवठ्यासाठी यात अतिनील दिव्यासह उत्तम उष्णता वायुवीजन आणि वातानुकूलित यंत्रणा आहे. इंटेलिजेंट एअर कंडिशनिंग सिस्टीम हवामानाच्या परिस्थितीनुसार/ उपलब्ध संख्येनुसार कूलिंग समायोजित करते.
इतर बातमी:
Bajaj Pulsar 220F अपडेटड बाईक लॉन्च, जाणून घ्या किती आहे किंमत