एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bhiwandi : भिवंडी पालिका विकास आराखड्यावर 2500 हून अधिक हरकतींचा पाऊस, सर्वच राजकीय पक्षांची ओरड

Bhiwandi Development Plannig: भिवंडीच्या विकास आराखड्यावर जवळपास 2500 हून अधिक हरकती आल्या आहेत. तसेच त्याला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. 

ठाणे : भिवंडीच्या विकास आराखड्याला (Bhiwandi Development Plan) सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केला असून तो मागे घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. भिवंडी महानगरपालिकेचा (Bhiwandi Municipal Corporation) विकास आराखडा 6 ऑक्टोंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर 10 नोव्हेंबरपर्यंत या विकास आराखड्या बाबत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. या मुदतीमध्ये भिवंडी महापालिकेकडे सुमारे अडीच हजाराहून अधिक हरकतींचा पाऊस पडला. 

भिवंडी पालिका प्रशासनाकडून भिवंडी शहराचा विकास आराखडा लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना समजावून देण्याकरता शुक्रवारी सायंकाळी उशिरा भिवंडी महापालिका सभागृहात एका विशेष सभेच्या आयोजन करण्यात आले होते. या सभेस केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, रईस शेख, आयुक्त अजय वैद्य यासोबतच माजी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मंडळी उपस्थित होती. या बैठकीत अनेकांनी विकास आराखडा विरोध केला असून 2003 मध्ये जाहीर केलेल्या विकास आराखड्याची अमलबजावणी अवघी 11 टक्के झाल्याने नव्याने आरक्षण आणि रस्ता रुंदीकरण होऊ नये अशी भूमिका मांडली.

विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर हरकती घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यावर अनेक जणांनी हरकती घेतल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष पदाधिकारी यांचा विकास आराखडा चुकीचा बनवला असल्याच्या आक्षेप नोंदवत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. प्रशासन आराखडा बनवताना सर्व माहिती गोळा करून जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करीत 2021 पासून हा आराखडा बनवला. तरी त्यामध्ये त्रुटी राहणे चुकीचे आहे. 

शहराचा विकास झाला पाहिजे, जनहितासाठी आरक्षण असली पाहिजेत, त्यामध्ये कोणाचा काही वेगळा हेतू असेल तर तो वाईट आहे. जिकडे रुंद रस्ता हवा आहे त्याचे आरक्षण त्या ठिकाणी टाकले नाही. मंदिराशेजारी साल्टर हाऊस आरक्षण टाकले आहे. या तांत्रिक चुका असून कार्यालयात बसून बनवलेला आराखडा चुकीचा ठरणार आहे. त्यासाठी या विकास आराखड्याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे.

सर्वच लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी यांनी विकास आराखडा रद्द करण्याची मागणी लावून धरली आहे. परंतु तो रद्द करता येणार नसल्याने मुदतीत आणि मुदतीनंतर आलेल्या हरकती विचारात घेऊन सुधारणा कराव्यात. त्यासाठी विश्वासात न घेता बनवलेला विकास आराखडा असल्याने जनआक्रोश चुकीचा नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra vidhan sabha election results:बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
बारामती अन् कर्जतमधून पवार बंधुंची आघाडी, अमित ठाकरेंनाही गोड बातमी; आघाडीवर असलेले 15 उमेदवार
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Embed widget