एक्स्प्लोर

कल्याण डोंबिवली रेरा प्रकरण; 40 बिल्डरांची बँक खाती गोठवली, SIT ची कारवाई

Maharashtra Kalyan News : कल्याण डोंबिवली रेरा प्रकरणी SIT नं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाशी संबंधित 40 बिल्डरांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

Maharashtra Kalyan News : कल्याण डोंबिवली रेरा प्रकरणात (Kalyan Dombivali RERA Case) संबधित 40 बिल्डरांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. एसआयटीकडून जिल्हाधिकारी, तहसील, आयुक्त, रजिस्ट्रार यांना प्रक्रिया थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

कल्याण (Kalyan) डोंबिवलीत (Dombivali) बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा परवानगी मिळवणाऱ्या सबंधित बिल्डरांभोवती एसआयटीनं फार्स आवळण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाशी सबंधित 40 बिल्डरांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. खोट्या कागदपत्र प्रकरणात तहसीलदार, रजिस्ट्रेशन कार्यालय आणि केडीएमसी आयुक्तांना एसआयटीनं पत्र व्यवहार करुन सर्व प्रकारची पुढील प्रक्रिया थांबवण्याची सूचना केली आहे. इतकंच नाहीतर सरकारी जागेवर किती ठिकाणी अतिक्रमण झालं आहे, यासंदर्भातही माहिती मागितली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रत केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खोटी सही आणि शिक्के वापरत अनेक बिल्डरांनी इमारतीच्या परवानग्या मिळविल्या होत्या. इतकंच नाहीतर त्याच परवागीच्या आधारे रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेतलं. वास्तू विशारद संदीप पाटील यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं. या प्रकरणात डोंबिवलीत एकूण 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, याचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. ईडीनं देखील या प्रकरणाची माहिती संबंधित विभागांकडून मागितली आहे. आता या प्रकरणी एसआयटीनं मोठे पाऊल उचलले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत खोट्या कागदपत्रंचा वापर करणाऱ्या 40 बिल्डरांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे ज्या जमिनींचे व्यवहार झाले आहेत. त्या संदर्भात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करण्यात आला आहे. या बिल्डरांनी ज्या ग्राहकांना घरं विकली आहेत. त्या नागरीकांची फसवणूक होऊ नये, यासाठी रजिस्ट्रेशन कार्यालयास सूचित करण्यात आलं आहे. नियमित आणि अनियमित इमारतीसंदर्भात केडीएमसी आयुक्तांकडे माहिती मागितली आहे. सरकारी आरक्षित जागेवर काय परिस्थिती आहे. याचा आढावा देखील एसआयटीकडून घेतला जात आहे. 

दरम्यान, 65 पैकी 7 बिल्डरांनी कल्याण न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी ४ बिल्डरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. याशिवाय 3 बिल्डरांना अटक पूर्व अंतरिम जामीन मंजूर करीत 3 आठवडय़ांची मुदत दिली गेली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaVidhansabha Election 2024 :  मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोपPune Flex :  ब्रीद वाक्यांचा वापर करत पुण्यात फ्लेक्सची उभारणीVipin Itankar Nagpur : मुंबई , पुणे , ठाणे, नागपुरातील मतदान केंद्र वेबतास्टिंगद्वारे जोडणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Embed widget