(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कल्याण डोंबिवली पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील दीड कोटींचा मुद्देमाल फिर्यादीना केला परत
Kalyan Dombivli: एकदा वस्तू चोरीला गेली की, ती परत मिळवण्याची अशा बरेच लोक सोडून देतात. अनेकवेळा चोरीची तक्रार करूनही वस्तू परत मिळत नाही.
Kalyan Dombivli: एकदा वस्तू चोरीला गेली की, ती परत मिळवण्याची अशा बरेच लोक सोडून देतात. अनेकवेळा चोरीची तक्रार करूनही वस्तू परत मिळत नाही. मात्र कल्याण-डोंबिवली पोलिसांनी गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना बेड्या तर ठोकल्याच त्यानंतर चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत कल्याण परिमंडळ तीनच्या वतीने चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल संबधित तक्रारदारांना परत करण्यात आला हे.
कल्याण-डोंबिवली हद्दीतील आठ पोलिस ठाण्यात चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, फसवणूक, मिसिंग, असे विविध गुन्हे दाखल होते. कल्याणचे अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी यामधील बहुतांश गुन्ह्याचा छडा लावण्यात कल्याण डोंबिवली पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी आरोपी तर अटक केलेच, मात्र त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात चोरी गेलेला ऐवज आणि दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून या महोत्सवाचे औचित्य साधत कल्याण पोलिस परिमंडळ तीन अंतर्गत नागरीकांना चोरीस गेलेले 1 कोटी 50 लाख 99 हजार रुपयांचे दागिने आणि ऐवज संबधित नागरिकांना परत करण्यात आला आहे. अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थीत कल्याण पश्चीमेतील वायलेनगर साई सभागृहात कार्यक्रमा दरम्यान हे सर्व साहित्य संबधित 80 फिर्यादी मूळ मालक असलेल्या नागरीकांना परत देण्यात आले. चोरीस गेलाल माल पुन्हा नागरीकांना मिळाल्याने नागरीकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Road Accident In Maharashtra : सहा महिन्यात रस्ते अपघातात 8068 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू, मुंबई-पुण्यात किती दगावले?
Vinayak Mete: विनायक मेटेंचा पाठलाग करणारी कार आणि कार मालक रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात; चौकशी सुरु
Nashik iskcon Temple : नाशिकच्या इस्कॉन मंदिरात आगळावेगळा जन्माष्टमी सोहळा, विविध कार्यक्रमांची रेलचेल!