(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Road Accident In Maharashtra : सहा महिन्यात रस्ते अपघातात 8068 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू, मुंबई-पुण्यात किती दगावले?
Maharashtra Road Accident : महाराष्ट्रात जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यात 17 हजार 275 अपघात झाले आहेत. यामध्ये आठ हजार 68 जणांचा मृत्यू झालाय.
Maharashtra Road Accident : मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं प्रमाण वाढले आहे. जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यात महाराष्ट्रामध्ये 17 हजार 275 अपघात झाले आहेत. यामध्ये आठ हजार 68 जणांचा मृत्यू झालाय. तर 14 हजार 200 जण जखमी झाले आहेत. 2021 च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यात सहा हजार 837 जणांचा मृत्यू झाला होता. तर 14 हजार 420 अपघात झाले होते. या अपघातात 11 हजार जण जखमी झाले. 2020 च्या महिल्या सहा महिन्यात 5 हजार 209 जणांचा मृत्यू झाला होता. या कालावधीत 11 हजार 481 अपघात झाले होते तर 9 हजार 641 जण जखमी झाले होते. 2020 आणि 2021 च्या तुलनेत 2022 जानेवारी ते जून यादरम्यान जास्त मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक आकडेवारी आहे.
यंदा नाशिकमध्ये सर्वाधिक मृत्यू -
जानेवारी 2022 ते जून 2022 यादरम्यान महाराष्ट्रात 17 हजार 275 अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये 8068 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिक जिल्ह्यात सहा महिन्यात रस्ते अपघातात 518 जणांचा मृत्यू झालाय. याच कालावधीत नाशिक शहरात 102 जणांचा मृत्यू झालाय. अहमदनगरमध्ये 451 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झालाय. पुणे जिल्ह्यात रस्ते अपघातात मागील सहा महिन्यात 461 जणांचा मृत्यू झालाय. तर पुणे शहरात 165 जणांचा मृत्यू झालाय. मुंबई शहरात रस्ते अपघातात 156 जणांचा मृत्यू झालाय. 2021 च्या पहिल्या सहा महिन्यात मुंबईमध्ये 202 जणांचा मृत्यू झाला होता.
मागील चार वर्षातील स्थिती काय?
2018 मध्ये रस्ते अपघातात राज्यात 13 हजार 261 जणांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये 12788 तर 2020 मध्ये 11 हजार 569 जणांचा मृत्यू झाला होता. 2019-20 मध्ये अपघातातील मृताची संख्या घटली होती. मात्र, 2021 मध्ये यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. 2021 मध्ये रस्ता अपघातात 13 हजार 528 जणांचा मृत्यू झाला. 2021 जानेवारी ते जून या कालावधीत सहा हजार 837 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2022 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत आठ हजार 68 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
जानेवारी ते जून 2022 मध्ये कोणत्या जिल्ह्यात किती जणांचा मृत्यू?
अकोला - 76
अमरावती जिल्हा 187
बुलढाणा 204
यवतमाळ - 226
वाशिम- 82
औरंगाबाद- 253
जालना-205
बीड - 256
उस्मनाबाद -184
नांदेड - 197
लातूर -177
परभणी - 95
हिंगोली - 110
कोल्हापूर - 241
पुणे जिल्हा - 461
सांगली - 213
सातारा - 276
सोलापूर जिल्हा - 325
भंडारा -101
चंद्रपूर - 242
गडचिरोली - 91
गोंदिया - 76
नागपूर जिल्हा - 260
वर्धा - 125
अहमदनगर - 451
धुळे - 199
जळगाव - 295
नाशिक जिल्हा -518
नंदूरबार - 102
रायगड - 144
रत्नागिरी - 95
सिंधुदुर्ग - 38
ठाणे -94
पालघर -164
नागपूर शहर -157
पुणे शहर -165
ठाणे शहर -119
मुंबई शहर -156
नाशिक शहर -102
औरंगाबाद शहर -101
सोलापूर शहर -37
नवी मुंबई -156
अमरावती शहर -53
पिंपरी चिंचवड -152
एमबीव्हीव्ही- 107