एक्स्प्लोर

Central Railway : दिवा स्टेशनमध्ये रणरागिनींचा गोंधळ, महिलांनीच रोखून धरली लोकल; 5 महिला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Central Railway : लोकलमध्ये महिलांनी गोंधळ घातल्याने रेल्वे वाहतूक उशिराने असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे.

Diva Railway Station : मुंबईला कामाला जाण्यासाठी चाकरमान्यांची मध्य रेल्वे कडून होणारी गैरसोय नेहमीच प्रवाशांना अनुभवायला मिळते. असाच एक प्रकार आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात घडला. लोकल काही वेळ थांबली आणि लगेच निघाली त्यामुळे काही महिलांनी लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. चक्क एक महिला तर मोटरमनच्या केबिनमध्येच चढून तिने लोकल थांबवली आणि 10 ते 15 मिनिटे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.

महिलांनी रोखून धरली लोकल

दिवा स्थानकात मोठा गोंधळ झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला. लोकलमध्ये महिलांनी गोंधळ घातल्याने रेल्वे वाहतूक उशिराने असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे पहाटेपासूनच मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावत आहे. पहाटे दिवा स्थानकात गोंधळ घडल्याची माहिती आहे.

दिवा स्थानकात मोठा गोंधळ

सकाळी 6.23 ची सीएसएमटी फास्ट लोकल अर्धा तास उशिराने आली, नेहमी प्लॅटफॉर्म 4 वर येणारी हीच लोकल प्लॅटफॉर्म 2 वर आली. आधीच उशीर त्यात प्लॅटफॉर्म बदलला, त्यामुळे लोकलमधील गर्दी वाढली. काही महिला दरवाजात लटकत होत्या. हे सांगण्यासाठी एक महिला मोटरमनच्या केबिनमध्ये चढली. या सर्व गोंधळामुळे अजूनही मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन उशिराने धावत आहेत.

दिवा स्टेशनमध्ये रणरागिनींचा गोंधळ

महिला मोटरमनच्या केबिनमध्ये चढल्याने लोकल 10 मिनिटे थांबली. या महिलेचं म्हणणे हेच होते की, महिला लटकत आहेत थोडा वेळ थांबा. हे बघून आरपीएफ आणि जीआरपी तिथे आले. यावेळेच बाकी प्रवासीही मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. अखेर मोटरमनच्या केबिनमधून खाली उतरली आणि लोकल सुटली. 

मात्र आता कारवाई करण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफने 5 महिलांना ताब्यात घेतलं आहे. या महिला सध्या दिवा स्थानकात जीआरपी ऑफिसमध्ये आहेत. दरम्यान, या महिलांवर कारवाई होऊ नये म्हणून दिवा प्रवासी संघटना प्रयत्न करत आहे. 

पाहा व्हिडीओ :

नेमकं घडलं काय?

आज सकाळी सातची लोकल मुंबईला जाण्यासाठी निघाली होती. मध्य रेल्वेच्या दिवा स्टेशनमध्ये काही महिलांना या लोकलमध्ये बसण्यासाठी मिळाले नाही. त्यामुळे महिलांनी चक्क लोकलच थांबून धरली. महिला डब्यातील काही महिला एका महिलेला सहकार्य करत तिला मोटरमनच्या केबिनमध्ये पाठवले मोटरमन गाडी थांबत नव्हता त्यामुळे महिलांनी गोंधळ केला, असं समजतंय. महिला एकत्र आल्या तर काय होऊ शकतं याचे उदाहरण आज दिव्यामध्ये पाहायला मिळालं.

दरम्यान, या महिलांकडून  पोलिसांना देखील अरेरावी करण्यात आली. महिला मोटरमनच्या केबिनमध्ये बसून गाडी चालवा, असे ती बोलत होती. कसेबसे या महिलेला मोटरमनच्या केबिनमधून खाली उतरवलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget