"पुन्हा कचरा रस्त्यावर फेकाल तर दुकान बंद करू"; केडीएमसीचा दुकानदारांना इशारा
Kalyan Dombivli News : पुन्हा कचरा रस्त्यावर फेकाल तर दुकान बंद करू, अशी सक्त ताकीद कल्याण डोंबिवली महापालिका उपायुक्तांनी दिली आहे.
Kalyan Dombivli News : कचरा प्रश्नी कल्याण डोंबिवली महापालिकेनं (Kalyan Dombivli Municipal Corporation) ठोस उपाययोजना सुरू केल्या आहेत. या पार्शवभूमीवर दुकानदारांना ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याबरोबरच रस्त्यात कचरा न टाकण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही काही दुकानदार कचरा रस्त्यावर फेकत असल्याचं निदर्शनास आल्यानं अखेर आज पालिकेचे उपायुक्त अतुल पाटील यांनी कल्याण पश्चिम येथे अचानक भेट दिली. आणि त्यांनी कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. मात्र त्यांनतर ही दुकानदार कचरा वर्गीकरण करणार नसतील आणि कचरा रस्त्यावर फेकताना आढळले तर दुकानच बंद करण्याची तंबी उपायुक्त पाटील यांनी दुकानदारांना दिली.
काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून दुकादारांना ओला आणि सुका असं वर्गीकरण करण्याबरोबरच रस्त्यात कचरा न टाकण्यासंदर्भात नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र काही भागांत दुकानदार या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं. दुकानदार दुकानातील कचरा दुकानासमोरील रस्त्यावर फेकत होते. काल (शनिवारी) उपायुक्त अतुल पाटील यांनी पालिकेच्या क प्रभागात फिरून रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी मोहिंदर काबुलसिंह शाळेच्या रस्त्यावर अनेक व्यापारी सकाळच्या सुमारास कचरा बाहेर फेकत असल्याचं दिसून आलं. तात्काळ या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत अनेक दुकानदारांना रस्त्यावर टाकलेला कचरा उचलण्याची शिक्षा करण्यात आली.
कल्याण डोंबिवलीतील दुकानदारांना शिस्त लागावी, यासाठी कर्मचाऱ्यांना उपायुक्तांकडून ताकीद देण्यात आली आहे. याबाबत उपायुक्त अतुल पाटील यांनी यापुढे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या दुकादारांना दुप्पटीपेक्षा जास्त दंड आकारण्या बरोबरच त्यांच्यावर निगराणीसाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्यांवर देखील निलंबनासारखी कारवाई केली जाणार आहे. तसेच, जे दुकानदार कचरा वर्गीकरण करणार नाहीत, त्यांचं दुकानच बंद करणार असल्याची तंबीही दुकानदारांना उपायुक्त अतुल पाटील यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
कल्याण डोंबिवलीतील बिल्डर फसवणूक प्रकरणात ईडीची एंट्री, केडीएमसीकडे कागदपत्रांची मागणी