एक्स्प्लोर

Dombivli : डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी सुरूच, धक्का लागला म्हणून तरूणाला मारहाण; आयुक्तांचा 'वॉकेबल सिटी'चा दावा फोल

KDMC : केडीएमसी आयुक्तांनी वॉकेबल सिटीचा दावा केल्यानंतर आता तो दावा या मुजोर फेरीवाल्यांनीच फोल ठरवला असून नागरिकांना फुटपाथवरून चालतानाही जीव मुठीत धरून चालावं लागतंय. 

ठाणे : डोंबिवलीत पुन्हा एकदा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. आयटी इंजिनिअर असलेल्या एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला. तरुणाने  त्या फेरीवाल्याला जाब विचारला. या गोष्टीचा राग मनात धरुन चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून या तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सुधीर पगारे असं या तरुणाचं नाव असून या प्रकरणी रामनगर पोलिसांनी तरुणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तरूणाला फेरीवाल्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर केडीएमसी आयुक्तांचा वॉकेबल सिटीचा दावा (Dombivli Walkable City)  फेरीवाल्यांनी फोल ठरवल्याचं स्पष्ट होतंय. 

तरुणाचे प्रशासनाला सवाल 

मी इतका टॅक्स भरतो, माझ्या शहरात माझ्यासाठी फूटपाथवर चालायला मिळत नाही. जो फूटपाथ आहे त्यावर फेरीवाले बसतात. मला त्याचा फायदा काय? महापालिका काय करते? असा संतप्त सवाल सुधीर पगारे या तरुणाने केला आहे. 

डोंबिवली पूर्व श्रीखंडेवाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. शुक्रवारी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशनजवळील मधुबन टॉकिज परिसरात गेला होता. तो त्या ठिकाणाहून जात असताना त्याला एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीरने त्याला जाब विचारला. 

जाब विचारल्याच्या रागात चार ते पाच फेरीवाल्यानी सुधीरला पकडून त्याला मारहाण केली. सुधीर पगारे याचे म्हणणे आहे की, मी डोंबिवलीचा सुशिक्षित सभ्य नागरिक आहे. मी महापालिकेला टॅक्स भरतो. परंतु चालण्यासाठी मला रस्ता मोकळा नाही, फूटपाथ नाही. जो रस्ता आहे. त्यावर फेरीवाले बसले आहेत. जेव्हा मी त्याची तक्रार करतो, त्यावेळी त्यांच्याकडून मला मारहाण केली जाते. ही कशी गुंडागर्दी आहे? महापालिका काय करते? असा संतप्त सवाल सुधीर यांनी उपस्थित केला आहे. 

या प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांचा शोध सुरु आहे, त्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

महापालिका आयुक्तांचा दावा फोल

केडीएमसीच्या नव्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यानी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शहराला वॉकेबल सिटी करण्यासाठी जे काही करता येईल ते करणार असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांच्या या दाव्याचा पोलखोल झाला आहे. फेरीवाल्यांसमोर महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. राजकीय पक्षांनी देखील आपली तलवार म्यान केली आहे. म्हणजे डोंबिवलीत नागरिकांना कुणीही वाली नाही हेच या घटनेतून उघड झाले आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Superstar Prabhas Wedding Post: प्रभासचं ठरलं? ख्रिश्चन मुलीशी बांधणार लग्नगाठ? अनुष्का शेट्टीच्या नावाचीही चर्चा, कोण होणार बाहुबलीची खऱ्या आयुष्यातली देवसेना?
प्रभासला खऱ्या आयुष्यातली 'देवसेना' भेटली? अनुष्का शेट्टी की, दुसरी कोण?
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Embed widget