एक्स्प्लोर

Dombivli MIDC Blast: केमिकलच्या वाफेमुळे हवेत दुर्गंधी, उद्ध्वस्त ढिगाऱ्यांच्या बाजूला मृतदेहांचे तुकडे, डोंबिवली MIDC मधील भीषण दृश्य

Dombivli News: डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले; मृतांचा आकडा 11, शोधकार्य सुरुच. याठिकाणी आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता आहे. डोंबिवलीत भीषण स्फोट, दोन-तीन किलोमीटरपर्यंत हादरे.

डोंबिवली: डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाची दाहकता आता समोर येताना दिसत आहे. येथील अमुदान कंपनीतील बॉयलरचा स्फोट (Dombivli MIDC Blast) झाल्याने ही दुर्घटना घडली होती. तब्बल दोन ते तीन किलोमीटर परिसरात या स्फोटाचे हादरे बसले होते. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 60 जण जखमी झाले होते. काल याठिकाणी आगाची धग आणि धुराचे साम्राज्य असल्याने फारसे शोधकार्य करता आले नव्हते. मात्र, आज दुसऱ्या दिवशी सकाळीच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (NDRF) पथके डोंबिवली एमआयडीसीत दाखल झाली आहेत. त्यांच्याकडून शोधकार्य सुरु असताना या स्फोटाची दाहकता समोर येत आहे. 

एनडीआरएफच्या पथकांनी शुक्रवारी सकाळी शोधकार्याला सुरुवात केली तेव्हा अमुदान कंपनीच्या परिसरातच ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर शेजारील के.जी. कंपनीच्या आवारात आणखी एक मृतदेह मिळाला. तर स्फोटाने बेचिराख झालेल्या परिसरात भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मृतदेहांचे अवशेष विखुरले आहेत. हे तुकडे एकाच मृतदेहाचे आहेत की नाही, याचा मेळ लावणेही अवघड होऊन बसले आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून मृतदेहाचे मिळतील ते भाग जमा करुन रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी पाठवले जात आहेत. 

याठिकाणी आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता एनडीआरएफच्या पथकाकडून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने ढिगाऱ्याखाली शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

हवेत रसायनांची वाफ, श्वास घेणेही धोकादायक

एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये हा स्फोट झाला त्या भागात रंग तयार केले जातात. त्यासाठी विविध प्रकारची रसायनं वापरली जातात. यापैकी बहुतांश रसायने ही विषारी असतात. काल आग लागल्यामुळे ही रसायनेही जळाली. त्यामुळे आता येथील हवेत रसायनांची वाफ पसरली आहे. त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. एनडीआरएफच्या जवानांना याठिकाणी मास्क लावून वावरावे लागत आहे. अग्निशमन दलाकडून याठिकाणी धूर कमी करण्यासाठी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.   

आणखी वाचा

Dombivli MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीत आणखी तीन मृतदेह सापडले; मृतांचा आकडा 11, शोधकार्य सुरुच

बॉयलरचा तुकडा दीड किमी उडून कारवर पडला, प्रत्यक्षदर्शींनी डोंबिवली स्फोटाची हादरवणारी कहाणी सांगितली!

डोंबिवली स्फोटात नेमकं काय घडलं, तीन-चार किमीपर्यंत हादरे, बॉयलरचा स्फोट नेमका कशामुळे?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Indrajeet Sawant : Prashant kortkar ला कायदेशीर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार : इंद्रजीत सावंतPrashant Koratkar Arrest Breaking : गेले अनेक दिवस फरार असलेला प्रशांत कोरटकर तेलंगणात सापडला?Eknath Shinde And Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आमनेसामने; नेमकं काय घडलं?Shivsainik Bail granted On Kunal Kamraकुणाल कामराच्या सेटची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मंजूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाला रक्तबंबाळ केलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
ममता कुलकर्णी आमच्यासोबतच, नाशिकमधील कुंभमेळ्यात...; किन्नर आखाड्याच्या प्रमुख नेमकं काय म्हणाल्या?
Kunal Kamra : कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
कुणाल कामरा प्रकरणावरून मविआचा सरकारवर हल्लाबोल, शरद पवारांच्या खासदाराचं मात्र वेगळंच मत; म्हणाले, एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं...
Embed widget