(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हा तर दसरा मेळाव्याचा ट्रेलर, बीकेसीवर शिवाजी पार्कच्या चारपटीनं लोकं येतील - दादा भुसे
Dada Bhuse : डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळावा हा दसरा मेळाव्याचा ट्रेलर आहे, असे विधान मंत्री दादा भुसे यांनी केलेय. लोकशाही मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना म्हणणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत आणि मला व्यक्तिगत जर विचारलं तर आज माझ्या मनासारखं झालेलं आहे.
Dada Bhuse : न्यायालयाने शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवरील ठिकाण नाकारले आहे. याबाबत डोंबिवलीतील हिंदू गर्व गजर्ना मेळाव्यात बोलताना बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे यांनी आजचा आपला मेळावा हा दसरा मेळाव्याचे ट्रेलर आसल्याचं विधान केलं. लोकशाही मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना म्हणणारे आपण सर्व कार्यकर्ते आहोत, शिवसैनिक आहोत आणि मला व्यक्तिगत जर विचारलं तर आज माझ्या मनासारखं झालेलं आहे. कारण शिवाजी पार्कचे मैदान आहे त्या मैदानाची मर्यादा माझ्या माहितीनुसार चाळीस-पन्नास हजाराची आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र ज्या आपल्या दसरा मेळाव्याकडे लक्ष ठेवून आहे आणि जो प्रतिसाद आपल्याला मिळतोय त्याचा चार पाच पटीने मैदान आपल्याला आवश्यक आहे. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईतील सर्वात मोठं मैदान घ्या असे सांगितलं. मुंबईत नसेल तर ठाण्यात पाहा, ठाण्यात नसेल तर नाशिकमध्ये मला संधी द्या अशी विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.
डोंबिवलीतील पाटीदार भवन सभागृहात शिंदे गटाच्या वतीने हिंदू गर्व गजर्ना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे , खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच महिन्यात राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्याना न्याय दिला गेला आहे. आज चारच शब्द सारखे ऐकविले जातात. गद्दार, पाठीत खंजीर खुपसला, बाप काढला, खोटारडे. बाळासाहेब माझे वडिल आहेत. त्याचा फोटो का लावला. मात्र मी सांगेन की, बाळासाहेब एका कुटुंबाचे प्रमुख नव्हते. ते संपूर्ण शिवसेनेचे बाप होते. बाप काढणार्यांचे विचार संकुचित आहेत, अशी टीका भुसे यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
मुख्यमंत्र्यांकडून महिलांना भाऊबीजचे गिफ्ट मिळणार -
मेळाव्यास महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित असल्याने मंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीत महिलांसाठी मोठी भेट देणार आहेत. पण ती काय भेट आहे याचा उलगडा त्यांनी न करता महिला वर्गाची उत्सुकता कायम ठेवली.
संबंधित बातम्या :