(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम, मुख्यमंत्र्यांकडून रात्री बाराच्या ठोक्याला रक्तदान
बाळासाहेबांचा वाढदिवस म्हणजे जयंतीच्या पूर्वसंध्येला राम मंदिराचे लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभहस्ते होतंय ही बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ठाणे : ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) सहभागी होत मध्यरात्री 12 वाजता रक्तदान (Blood Donation) करुन नववर्षाचं स्वागत केलंय. ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते ठाण्यात बोलत होतेय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेली 29 वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू आहे. काही उपक्रम सुरू होतात पण कालांतराने बंद होतात. परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या उपक्रम तसेच अखंडितपणे सुरू आहे.मी स्वतः 31 डिसेंबरला रक्तदान करतो. एक आगळवेगळा रक्तदान शिबिर महा रक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केला जातो. रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झालेला नाही.
नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली 29 वर्षे आपण करत आहे. मला वाटतं नाही जगामध्ये जगामध्ये अशा प्रकारचा 31 डिसेंबर कुठे साजरा होतो. दिघे साहेबांनी सुरू केला हा उपक्रम आणि मला आठवतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरुवात पहिली केली. आनंद दिघे साहेबांनी जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवले. या रक्तदान शिबिरामध्ये कुणालाही बोलवावं लागत नाही. कोणाला निमंत्रण पाठवावा लागत नाही, आपोआप सगळे लोक या ठिकाणी येतात शेकडो लोक येतात आणि रक्तदान करतात याचे वैशिष्ट्य आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर पण माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी सांगत असतो मी तुमच्यातलाच कार्यकर्ता म्हणून काम करतोय. कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. मी नेहमी सीएमचा डेफिनेशन सांगतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर पण माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी जेवढे काही करता येईल ते आपण करतोय.
बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
22 जानेवारीला अयोध्यामध्ये राम मंदिर होत आहे. करोडो राम भक्तांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि त्याचबरोबर आपल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब यांचे स्वप्न होतं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे स्वप्न होतं की, आयोजित राम मंदिर व्हावे आणि हे बाळासाहेबांच्या वाढदिवस म्हणजे जयंतीच्या पूर्वसंध्येला त्याचं लोकार्पण देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभहस्ते होतंय ही खरी बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.