एक्स्प्लोर

Bhiwandi Crime News: सहा महिन्याच्या लहान मुलाचे अपहरण करून नक्षली भागात दोन लाखात विक्री; पोलिसांकडून तिघांना अटक

Bhiwandi Crime News: भिवंडीतील चिमुकल्याची नक्षल भागात दोन लाखात विक्री करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Bhiwandi Crime News:  भिवंडी शहरातून सोळा दिवसांपूर्वी एका सहा महिन्याच्या मुलाचे अपहरण करून त्याची झारखंड नक्षली भागात  दोन लाख रुपयांत विक्री करणाऱ्या त्रिकुटास शांतीनगर पोलिसांनी भिवंडी सह झारखंड येथून मोठ्या शिताफीने अटक करत छोट्या अपहरण झालेल्या बालकास पुन्हा आईच्या कुशीत सोपवण्यात यश मिळवले आहे. पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी ही माहिती दिली आहे. या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर उपस्थित होते.

शांतीनगर न्यू आझाद नगर येथील झोपडपट्टीत राहणारी महिला शहाना अन्सारी हिने 14 एप्रिल रोजी आपल्या सहा महिन्याच्या अरबाज यांस शेजारी राहणारी मैत्रीण फातिमा हिच्या घरी झोपवून रमजानच्या खरेदीसाठी सकाळी गेली होती. दुपारी खरेदी करून मैत्रिणीच्या घरी पोहचल्यावर अरबाज तेथे नसल्या बाबत समजल्यावर शहाना अन्सारी हिच्या पायाखालची वाळू सरकली. परिसरात शोध घेवून ही न सापडल्याने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार वडील  शाहबाज मोहमद याईया अन्सारी यांनी दिली होती. घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक बनवून शोध घेण्यास सुरुवात केली.  पोलीस पथकाने परिसरातील काही व्यक्तींकडून माहिती घेत सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे प्रथम भिवंडी शहरात फुटपाथवर कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अफरोज अबुबकर शेख (वय 26 रा. शांतीनगर) यास ताब्यात घेत कसून तपास केला असता त्याने अपहरणाची कबुली देत बाळाला शंभू सोनाराम साव (वय 50 वर्षे रा. येवईनाका ता. भिवंडी) या मार्फत विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास करीत झारखंड येथे पळून जण्याच्या तयारीत असलेल्या शंभू सोनाराम साव यास कल्याण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेत अटक केली.

त्याच्याकडे गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला असता अपहरण केलेल्या मुलास झारखंड राज्यातील ओळखीची महिला मंजुदेवी महेश साव (वय 34 वर्षे रा. जितकुंडी) भागात महिलेस दोन लाख रुपयांना बाल विक्री केल्याची कबुली दिली. विशेष म्हणजे जितकुंडी गाव हा नक्षली भागात येतो. या महिलेचे वास्तव्य ठिकाण हे रांची पासून 200 दोनशे किमी अंतरावर नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याने स्थानिक सशस्त्र पोलिसांच्या मदतीने या गुन्ह्यातील बाळाला विकत घेणारी महिला आरोपी मंजुदेवी महेश साव हिस बाळासह ताब्यात घेतले. त्यानंतर आज बाळाला पोलाीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सहा महिन्याच्या चिमुरड्या अरबाज यास आई शहाना अन्सारी हिच्या कुशीत सोपविले.

माझं मुल हरविल्या नंतर तब्बल १६ दिवस ते माझ्या पासून पासुन हिरावल्याने मी अरबाज परत मिळेल ही आशा सोडून दिली होती.पण शांतीनगर पोलिसांनी प्रत्येक वेळी मला धीर देत माझं मुल शोधून आज माझ्या हाती सोपवलं माझ्या आनंदाला पारावार उरला नाही अशी भावना व्यक्त करीत अपहरण झालेल्या चिमुरड्या अरबाज ची आई शहाना अन्सारी हिने पोलिस अधिकारी पोलिस कर्मचारी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर, शैलेश म्हात्रे या तपास अधिकाऱ्याने सांगितले की, बाळाची विक्री नक्षली भागात झाल्याने आम्ही आधी त्याठिकाणी नक्षली भागातील सर्व माहिती गोळा केली. बाळ तिथे असल्याचे खात्री केली त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने बाळासह महिलेला ताब्यात घेण्यात आला. बाळाला आईच्या स्वाधीन करतांना खूप आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणीWalmik Karad Car Pune : 'या' कारमधून वाल्मिक कराड पुणे CID कार्यालयात शरणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
Embed widget