Bhiwandi News: 881 कोटींच्या निधीनंतरही मनोर वाडा भिवंडी मुख्य रस्ता खड्डेमय
Bhiwandi News: पावसामुळे मनोर वाडा भिवंडी या 64 किमी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

Bhiwandi News भिवंडी: ठाणे-पालघर जिल्ह्यांना जोडणारा भिवंडी-वाडा रस्ता सध्या खड्डेमय स्थितीत आहे. पावसामुळे मनोर वाडा भिवंडी या 64 किमी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तब्बल 801 कोटी रुपयांचा निधी ईगल इन्फ्रा कंपनीला देण्यात आला आहे तर 80 कोटी या मार्गावर काँक्रीट पॅच मारण्यासाठी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावर 881 कोटी मंजूर झाल्यानंतरही कामांचा दर्जा आणि गती अत्यंत संथ असून, नागरिकांच्या जीवाला रोज धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत रस्ता रोकोचा इशारा दिला आहे.
दरम्यान भिवंडी वाडा मनोर रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका वाहन चालकांना बसत असल्याने भिवंडी ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शिवसेना शांताराम मोरे भिवंडी वाडा रस्त्याची पाहणी करण्यास गेले. परंतु मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्यांनी थेट हातामध्ये फावडा आणि घमेला घेत या रस्त्यावरील खड्डे बुजवायला सुरुवात केली. खरंतर सत्ताधारी पक्षात असणारे आमदार या ठेकेदारांकडून काम करून घेण्याऐवजी त्यांच्यावर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची वेळ आली असताना देखील हे ठेकेदार जर खड्डे बुजवत नसतील तर आमदारांवर खड्डे बुजवण्याची वेळ आली असताना देखील ज्या ठेकेदारी खड्डे बुजवत नसतील तर या मार्गावरून प्रवास करणारे स्थानिकांनी कोणाकडे पहावं .
लोकप्रतिनिधींची देखील काही जबाबदारी असते, म्हणून मी हे खड्डे बुजवत आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विशेष म्हणजे, या रस्त्याचे दुरुस्तीचे काम जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. ही कंपनी जिजाऊ सामाजिक संस्थाचे संस्थापक निलेश सांबरे यांची असून, त्यांनी नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आमदार मोरे म्हणाले, "सांबरे पक्षात आले असले तरी ते एका कंत्राटदार कंपनीचे मालक आहेत. त्यांचं काम रस्ते दुरुस्त करणे आहे आणि ते काम त्यांनी योग्य प्रकारे केलंच पाहिजे. कुणालाही पाठीशी घालणार नाही." शेवटी, आमदार मोरे यांनी इतर लोकप्रतिनिधींनाही आवाहन केलं की, "रस्त्यांवरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष न करता, खडी व रेती टाकून ते बुजवावेत. हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे." या घटनेनंतर भिवंडी-वाडा रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाची झोप जागी होणार का? याकडे आता संपूर्ण भिवंडी वासियांचे लक्ष लागले आहे.



















