एक्स्प्लोर

विद्यार्थिनींना नोटबूक तपासण्याच्या बहाण्याने बोलवायचा आणि अश्लील व्हिडीओ दाखवायचा, भिवंडी महापालिका शाळेच्या शिक्षकाला बेड्या

Bhiwandi Crime : भिवंडी महापालिकेच्या शाळेत शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा आणि विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना भिवंडीतील महानगरपालिकेच्या शाळेत एका शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली. या शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ दाखवल्या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीनगर पोलिसांनी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. मुइझम्मील हुसेन शबीर अहमद शेख (वय 36) असं अटक करण्यात आलेल्या शिक्षक आरोपीचे नाव आहे. 

शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महापालिकेच्या उर्दू शाळेत इयत्ता सातवीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकाने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडित मुलगी 26 ऑगस्ट रोजी दुपारी मधली सुट्टी झाल्यानंतर शाळेच्या शौचालयात जाऊन आली. ही मुलगी सुमारे दोन तास उशिराने वर्गात गेल्यामुळे वर्ग मॉनिटरने तिची बॅग शिक्षक कक्षात ठेवली होती. त्यामुळे आपली बॅग घेण्यासाठी शिक्षक वर्गात गेली. त्यावेळी शिक्षकांनी तिला पालकांना घेऊन येण्यासाठी सांगितलं. 

दिनांक 28 ऑगस्ट रोजी पालक शाळेत गेल्यानंतर शिक्षकांसमोर जेव्हा त्या मुलीला उशीर झाल्याबद्दल विचारलं, त्यावेळीदेखील तिने काहीही बोलण्यास नकार दिला. परंतु घरी गेल्यानंतर या पीडित मुलीला विश्वासात घेऊन जेव्हा पालकांनी विचारलं तेव्हा मुलीने सत्य घटना सांगितली.

शिक्षक मुजम्मिल अन्सारी मुलींना नोटबुक चेक करण्याच्या बहाण्याने बोलावतात आणि अश्लील व्हिडीओ दाखवतात. त्यावेळी मुलींचा दुपट्टा खेचतात, तसेच मोबाईल व्हिडीओ बाबत कोणालाही काही सांगितलं तर तुम्हाला वर्गात मारेन अशी धमकी देखील या पीडित मुलीला देण्यात आली होती. 

ही बाब समोर आल्यानंतर पालकांनी आरोपी शिक्षकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. शांतीनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी शिक्षका विरोधात कलम 74, 351(2) आणि  लैंगिक संरक्षण अधिनियम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शिक्षकाला शांतीनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 
Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 
Nashik News: राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
Devendra Fadnavis : वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AMABP Majha Headlines : 07 AM  : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सICC Women's T20 World : Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 
Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 
Nashik News: राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
Devendra Fadnavis : वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार! निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातील चालना मिळणार
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Jyoti Mete : शरद पवारांसह अजित पवारांशी बोलणी सुरु, ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवणार?  
Eid a milad 2024 Holiday: मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Embed widget