Bhiwandi : भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याने शाळकरी मुलांसह 40 जणांचा चावा घेतला, अखेरीस नागरिकांनी ठेचून मारले
Bhiwandi : भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून सोमवारी (दि.7) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलांवर त्यांनी हल्ला चढवत तब्बल 40 जणांना चावा घेतला आहे.
![Bhiwandi : भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याने शाळकरी मुलांसह 40 जणांचा चावा घेतला, अखेरीस नागरिकांनी ठेचून मारले Bhiwandi 40 people including school children were bitten by a stray dog in Bhiwandi eventually crushed to death by citizens Marathi News Bhiwandi : भिवंडीत पिसाळलेल्या कुत्र्याने शाळकरी मुलांसह 40 जणांचा चावा घेतला, अखेरीस नागरिकांनी ठेचून मारले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/222f5594b44c475457fac51c8b1f16471720461930056924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhiwandi : भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून सोमवारी (दि.7) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या मुलांवर त्यांनी हल्ला चढवत तब्बल 40 जणांना चावा घेतला आहे. त्यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा लहान मुलांचा अधिक समावेश आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने मागील तीन दिवसात या शांतीनगर , कामतघर, दर्गाह रोड परिसरात अनेक नागरिकांना चावा घेतल्यानंतर आज या कुत्र्याने हैदोस घालत हा हल्ला चढवला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याला दगडाने ठेचून ठार मारले
सर्वच चावा घेतलेला मुलांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले आहे. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर झाली आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. स्थानिक नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला दगडाने ठेचून ठार मारले आहे. भिवंडी पालिका क्षेत्रातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
भटक्या कुत्र्यांचे निरबिजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांचे निरबिजीकरण मागील कित्येक वर्षांपासून बंद असून मनपा आयुक्त अजय वैद्य यांनी 2023 पासून याबाबत निरबिजीकरण करण्यासाठी निविदा प्रकाशित केल्या होत्या. परंतु दोन वेळा त्यास कोणता प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु त्यानंतर आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थंडावली होती. नुकताच जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आजच पालिका प्रशासनाच्या वतीने तातडीची निविदा प्रकाशित करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून येथे आठ दिवसांमध्ये भिवंडी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निरबिजीकरण करण्यासाठी यंत्रणा सज्ज करणार याची माहिती पालिका आयुक्त तथा प्रशासक अजय वैद्य यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Worli Hit And Run Case: 'वरळी हिट अँड रन' प्रकरणात मृत पावलेली महिला जेष्ठ अभिनेत्याची सख्खी पुतणी, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, 'फाशी झालीच पाहिजे...'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)