एक्स्प्लोर

Bakri Eid Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या नमाजला विरोध; भाजप-शिंदे गटाचं आंदोलन, कार्यकर्ते बॅरिकेडसवर चढले, वातावरण तापलं

Thane Durgadi Fort Kalyan: दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर, तर पायथ्याशी ईदगाह ही हिंदू, मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळं आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लीम समाजात वाद सुरू आहे.

Thane Durgadi Fort Kalyan: कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आला आहे. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच, वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं जारी केले आहेत. गुरुवारी सकाळीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून दुर्गाडी किल्ल्यावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच, दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरतीसुद्धा केली. यावेळी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. तसेच, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर, तर पायथ्याशी ईदगाह ही हिंदू, मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळं आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लीम समाजात वाद सुरू आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की, इथे मूळ दुर्गा देवीचं मंदिर आहे. तर मुस्लीम समाजबांधव ईदगाह असल्याचा दावा करत आहे. हा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र शिवसेना गेल्या 50 वर्षांपासून याच कारणास्तव आंदोलन करतेय. गेले काही वर्ष दोन्ही शिवसेना इथे आंदोलन करताना दिसून येत आहेत, तर यावर्षी भाजप देखील या आंदोलनात सहभागी झाली आहे.

कल्याणचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आणि गेल्या 40 वर्षांपासून धगधगत असलेला एक संघर्ष दरवर्षी 'बकरी ईद' आली की, दुर्गाडी किल्ल्यावर एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना मंदिरात जाण्यास बंदी घातली जाते. आणि याच अन्यायाविरोधात, तब्बल 4 दशकं उलटली तरी एक प्रथा आजही तितक्याच प्रखरतेनं सुरू आहे ती म्हणजे घंटानाद आंदोलन आनंद दिघे यांनी 1986 मध्ये सुरू केलेली ही घंटानादाची प्रथा आजही कायम आहे. दोन्ही गटाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यावर सुनावणी सुरूच आहे. 

दुर्गाडी किल्ल्याचा वाद नेमका काय आहे ? 

बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी जिल्हा प्रशासनाकडून बंदी घातली जाते. बंदीच्या या निर्णयाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध दर्शविला होता. 1982 सालापासून शिवसेनाप्रमुखांच्या आदेशांनुसार शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी याच ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केले, ते आजतागायत सुरू आहे. दुर्गाडी किल्ल्याचा वाद गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. यापूर्वीही अनेकदा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. न्यायालयाच्या अंतिम निकालापर्यंत तात्पुरती व्यवस्था पोलिसांकडून केली जाते. परिसरात कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या ठिकाणी राज्य राखीव पोलिसांकडून अहोरात्र जागता पहारा असतो. सणासुदीच्या काळात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येत असतो. 

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या परिसरातील धार्मिक वाद दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत आला आहे. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवरील मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. तसेच वर्षभरातील इतर दिवशी किल्ला परिसरात कोणत्याही प्रकारची इस्लामी उपासना करण्यास मनाई असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत. दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर, तर पायथ्याशी ईदगाह ही हिंदू, मुस्लिम धर्मांची धार्मिक स्थळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून हिंदू आणि मुस्लीम समाजात वाद सुरू आहे. हिंदू संघटनांचा दावा आहे की येथे मूळ दुर्गा देवीचे मंदिर आहे. तर मुस्लीम समाजबांधव ईदगाह असल्याचा दावा करत आहे. हा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र शिवसेना गेल्या 50 वर्षांपासून याच कारणास्तव आंदोलन करते. गेले काही वर्ष दोन्ही शिवसेना इथे आंदोलन करताना दिसून येत आहेत तर यावर्षी भाजप देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
बुरखा घालून आल्या, भांडी चोरुन गेल्या! दोन बुरखाधारी महिलांचा कारनामा सीसीटीव्हीत कैद, भिवंडी पोलिसात गुन्हा दाखल  
Kalyan Land Scam : कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
कल्याण तहसील कार्यालयात धक्कादायक प्रकार; अवघ्या एका तासात सातबारावर दुसऱ्या व्यक्तीचे नाव लावल्याचा आरोप
Pratap Sarnaik On Marathi Compulsory Auto Taxi Driver: मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
मुंबईसह महाराष्ट्रात मराठी येत नसल्यास आता चालकाचे लायसन्स रद्द होणार; आज शासन निर्णय येणार, प्रताप सरनाईक म्हणाले, मग्रुरी मोडून काढणार!
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याचे महत्त्व नाही: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget