बदलापूर घटनेनं सरकारला खडबडून जाग; राज्यात शिपाई ते मुख्याध्यापक पोलीस पडताळणी होणार, GR निघाला
राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन निर्णय जारी झाली आहे.

ठाणे : पश्चिम बंगालमधील कोलकत्यात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येचा प्रकरणात देशभरात संतापाची लाट असतानाच महाराष्ट्रातील बदलापूरच्या या घटनेन त्यात भर घातलेय या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थींनीच्या सुरक्षा विषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासन निर्णय जारी झाली आहे. राज्यातील शिपाई ते मुख्याध्यापक पोलीस पडताळणी होणार आहे.
बदलापूर (Badlapur) लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षय शिंदे यांनी बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. यानंतर बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्याची परिणती उग्र आंदोलनात झाली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
काय आहे शासन निर्णय?
- शाळा आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने काळजी घेण्याचे निर्देश
- सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूलबसचे चालक इत्यादी व्यक्तींची शाळा व्यवस्थापनाकडून चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करुन घेणे आवश्यक
- शाळांमध्ये तक्रार पेटींचा देखील प्रभावीपणे वापर व्हावा
- सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदींचे अनुपालन
- शालेय स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन पुढील एका आठवड्यात करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
- राज्यस्तरीय सुरक्षा आढावा समितीचे देखील गठन करण्यात आले असून अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असणार
- सोबत आणखी सहा सदस्य समितीत असणार
- शालेय विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापनाने तो न दडवता शिक्षणाधिकाऱ्यांना सांगावा अन्यथा कारवाई आदेश
कोण आहे आरोपी अक्षय शिंदे?
- अक्षय शिंदे बदलापूर येथील शाळेचा शिपाई
- या आधी अक्षय एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता
- एका कंत्राटामार्फत शाळेत शिपाई म्हणून लागला
- अक्षय,आई-वडील आणि त्याचा भाऊ आणि भावाची बायको असे त्याचे कुटुंब
- अक्षयची तीन लग्न झाली होती मात्र तिनही बायका सोडून गेल्या होत्या
- अक्षय कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील
- मात्र अक्षयचा जन्म बदलापूरमधील खरवई गावात
- अक्षयचं वय 24 वर्षे
- अक्षयचे शिक्षण दहवीपर्यंत
हे ही वाचा :
बदलापूर घटनेनं सरकारला खडबडून जाग; राज्यात शिपाई ते मुख्याध्यापक पोलीस पडताळणी होणार, GR निघाला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
