Thane News : पावसाळी पर्यटनाचा मार्ग मोकळा! अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळं होणार सुरू
Ambernath Monsoon Tourist Places : अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटक स्थळ होणार सुरू होणार आहेत. पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्यात आली आहे.
Monsoon Tourist Places in Ambernath : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर (Tourist Spots) बंदी आदेश मागे घेण्यात आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटक स्थळ होणार सुरू होणार आहेत. पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्यात आली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या मागणीला यश आलं आहे. अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते. मात्र, भाजप आमदार किसन कथोरे यांनी पर्यटन स्थळांवरील बंदी हटवण्याची मागणी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. आज ही मागणी पूर्ण होऊन सर्व पर्यटक स्थळांवरील बंदी हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पावसाळी पर्यटनाचा मार्ग खुला
अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, बारवी नदी, चिखलोली, मलंगगड परिसर अशी अनेक पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहलीसाठी येत असतात. मात्र येथे आल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच मद्यपान करून पाण्यात उतरणं आणि अशा अनेक गोष्टींमुळे दरवर्षी अनेक पर्यटकांचा मृत्यू होतो, तर अनेक अपघातही घडतात. यामुळे पावसाळी पर्यटन स्थळांवरील बंदी घालण्यात आली होती.
अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटक स्थळ होणार सुरू
यंदा अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर 30 जुलै ते 30 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले होते. मात्र यावर आमदार किसन कथोरे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बंदी हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटक स्थळांवरील बंदी हटवण्यात आली असून आमदार यांच्या मागणीला यश आले आल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये देखील एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
पर्यटनस्थळांवर 30 ऑगस्टपर्यंतची बंदी हटवली
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर (Kondeshwar), भोज धरण (Bhoj Dam), बारवी नदी (Barvi River), चिखलोली (Chikhloli) अशी जवळपास दहा ते बारा पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहलीसाठी येत असतात. पावसाळी पर्यटनामुळे वाढत असलेल्या जीवितहानीमुळे पर्यटन स्थळांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता ही बंदी हटवण्यात आली आहे.
संबंधित इतर बातम्या :