एक्स्प्लोर
यूट्यूबची सेवा जगभरात बंद, कारण अस्पष्ट
व्हिडओ प्ले होताना येणाऱ्या एररचे स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर टाकले जात आहेत. ट्विटरवर तर #YouTubeDOWN हॅशटॅगही ट्रेण्ड होत आहे.

नवी दिल्ली : गूगलचा व्हिडीओ प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब जगभरात बंद पडलं आहे. जगभरात कुठेच यूट्यूबवर व्हिडीओ प्ले होत नाहीत. व्हिडओ प्ले होताना येणाऱ्या एररचे स्क्रीनशॉट आता सोशल मीडियावर टाकले जात आहेत. ट्विटरवर तर #YouTubeDOWN हॅशटॅगही ट्रेण्ड होत आहे.
यूट्यूबच्या वेबसाईटवर गेल्यावर तिथे '500 Internal Server Error' असा एरर दिसतो. शिवाय, इतर व्हिडीओही दिसतात. मात्र व्हिडीओवर क्लिक केल्यानंतर व्हिडीओ प्ले होत नाही.
आज पहाटेपासूनच यूट्यूबची सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. सुरुवातीला अनेकांना आपल्या फोन किंवा कॉम्प्युटरमध्ये काही समस्या असल्याचे वाटले होते. मात्र, त्यानंतर सोशल मीडियावर जगभरातून यासंदर्भात ट्वीट आणि पोस्ट शेअर होऊ लागले आणि सगळीकडेच यूट्यूब बंद असल्याचे समोर आले.
यूट्यूबकडून माहिती :
"यूट्यूब बंद पडल्याचे सांगितल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तुमच्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत.", असे यूट्यूबकडून सांगण्यात आले आहे.
Thanks for your reports about YouTube, YouTube TV and YouTube Music access issues. We're working on resolving this and will let you know once fixed. We apologize for any inconvenience this may cause and will keep you updated.
— Team YouTube (@TeamYouTube) October 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
